शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:08 IST

एका पुरुषाचे आपल्याच मुलीच्या सासूशी अनैतिक संबंध होते, हे त्याच्या पत्नीला कळताच त्याचे अतिशय धक्कादायक कृत्य केले.

उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी पुन्हा एकदा समाजातील बिघडलेल्या नातेसंबंधांची झलक दाखवत आहे. गांधीपार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनीपूर परिसरात एका ५० वर्षीय महिलेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तिच्याच पती आणि सासरच्या लोकांनी हा प्रकार केल्याचे समोर येत आहे.

हा अपघात नाही, हल्लाच!

मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा नावाची महिला शनिवारी सकाळी संशयास्पद परिस्थितीत जळालेल्या अवस्थेत आढळून आले. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. यशोदा यांच्या मुलीच्या मते, तिच्या आईवर झालेला हल्ला कुठलाही अपघात नसून, तो मुद्दाम केला गेला होता.

यशोदा यांची मुलगी म्हणाली की, तिच्या वडिलांचे (यशोदा यांचे पती) तिच्या सासूशी अवैध संबंध होते. या नात्याला यशोदा यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळेच रागाच्या भरात त्यांच्या वडिलांनी म्हणजेच यशोदा यांच्या पतीने आणि सासरच्या व्यक्तींनी मिळून यशोदा यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.

पोलीस तपास सुरू!या प्रकरणावर पोलिसांनी अधिकृत चौकशी सुरू केली असून, महिलेने दिलेल्या जबाबातही हेच आरोप स्पष्टपणे नमूद केले आहेत. तिची मुलगी आणि मुलाने देखील आपल्या वडिलांवर आणि कुटुंबातील काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, याप्रकरणात तक्रारींची चौकशी प्राधान्याने केली जात आहे आणि आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

नातेसंबंधांचा विचित्र चेहरायाआधीही अलिगढमध्ये एक सासू तिच्या होणाऱ्या जावयासह पळून गेल्याची घटना चर्चेत आली होती. आता पुन्हा अशाच प्रकारच्या विचित्र आणि धक्कादायक नातेसंबंधांमुळे एक महिलेचे जीवन धोक्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार