मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश; सहा निराधारांकडून शेतात करून घेत होते वेठबिगारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 10:19 PM2019-03-06T22:19:03+5:302019-03-06T22:19:28+5:30

रेल्वेस्टेशन, बसस्थानकासह विविध ठिकाणी भीक मागणा-या निराधार, अपंग, मतिमंदांचे अपहरण करून त्यांना शेतात राबवून घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे़

Human trafficking racket exposed in Srigonda | मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश; सहा निराधारांकडून शेतात करून घेत होते वेठबिगारी

मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश; सहा निराधारांकडून शेतात करून घेत होते वेठबिगारी

Next

अहमदनगर /श्रीगोंदा - रेल्वेस्टेशन, बसस्थानकासह विविध ठिकाणी भीक मागणा-या निराधार, अपंग, मतिमंदांचे अपहरण करून त्यांना शेतात राबवून घेतले जात असल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा एकदा समोर आला आहे़. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वांगदरी येथील तिघा शेतमालकांच्या तावडीतून सहा जणांची सुटका केली़ याप्रकरणी तिघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्यात मानवी तस्करी करणाºया टोळ्या कार्यरत असल्याचे समोर आले आहे़ बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वांगदरी परिसरातील अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करत होते़ यावेळी गावातील शेतमालक कैलास जब्बार गिºहे, करतारसिंग नरहरी गिºहे व विलास सोनाजी गिºहे यांनी जबरदस्तीने काही निराधारांना डांबून ठेवत त्यांच्याकडून शेतातील कामे करून घेतले जात असल्याचे पोलिसांना समजले़ पोलिसांनी तपासणी केली तेव्हा या तिघांच्या शेतात प्रत्येकी दोन जण राबताना आढळून आले़ यावेळी पोलिसांनी  संतोषकुमार रामचंद्र राजवंशी (वय ४० रा़ रघुनाथपूर मिडकी, कलकत्ता),  ओमित कृपासिंधू नसपोर (वय ३० रा़ सायगाहावडा, कलकत्ता), संतोष मेंटोसाला (वय २२), घनश्याम चौधरी, सुनील पोपट मोरे (रा़ पंढरपूर) व सुनील सोपान चव्हाण (वय ४० रा़ म्हाळुंगी ता़ शिरुर) या सहा जणांची सुटका केली़ याप्रकरणी सहाय्यक फौजदार भानुदास नवले यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कैलास, करतारसिंग व विलास यांच्याविरोधात बेकायदेशीर वेठबिगारीस भाग पाडणे (कलम ३७५) प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ हे तिघे आरोपी फरार आहे़ पोलिसांनी सुटका केलेले संतोष व घनश्याम हे मतिमंद आहेत़  स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आऱपी़ खंडागळे, हेडकॉन्स्टेबल एम़एल़ गाजरे, व्ही़बी़ मखरे, व्ही़एस़ मासाळकर, वाय़ए़ सातपुते, व्ही़एस़ धनेवार, एस़एस़ दरंदले, एम़डी़ गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 
 
रेल्वेस्टेशन परिसरातून आणले होते या सहा जणांना 
पोलिसांनी वांगदरी येथून सुटका केलेल्या सहा जणांना आरोपींनी श्रीगोंदा व दौंड रेल्वे स्टेशन येथून जबरदस्तीने आणले होते़ त्यांच्याकडून शेतातील सर्व कामे करून घेतली जात होती़ या बदल्यात त्यांना काहीच मोबदला दिला जात नव्हता. तसेच त्यांना पोटभर अन्नही दिले जात नसल्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले आहे़ 

Web Title: Human trafficking racket exposed in Srigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.