शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास दिलासा नाहीच; अटकपूर्व जामिनीवरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:24 IST

Hrishikesh Deshmukh is not get relief : मनी लााँड्रिंग प्रकरणी ऋषिकेशसह अन्य देशमुख कुटुंबियांनाही ईडीकडून चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले आहे. 

मुंबई - ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास कोणताही दिलासा नाही. ऋषिकेश यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. ऋषिकेश देशमुख हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा आहे. मनी लााँड्रिंग प्रकरणी ऋषिकेशसह अन्य देशमुख कुटुंबियांनाही ईडीकडून चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले आहे. 

तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांचा मुलगा ऋषिकेश याचा अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

ऋषिकेश देशमुख यांना शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे यासाठी हे ईडीने समन्स पाठवले होते. मात्र, ऋषिकेश देशमुख या चौकशीला हजर राहिले नसून त्यांनी पंधरा दिवसांची वेळ मागितली. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंज यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आली. दुसऱ्यादिवशी म्हणजे ६ नोव्हेंबरला ऋषिकेश देशमुख यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.

अनिल देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले होते. त्यांची १३ तास चौकशी करण्यात आली आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल करत, देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.  

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालय