शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांचा आर्थिक स्वार्थ कसा जागा झाला? विद्यार्थ्याचे अपहरण, रोजच एकत्र असायची उठबस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:26 IST

वाशी सेक्टर १० परिसरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याचे त्याच्याच मित्रांनी अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

नवी मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पोलिसांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असून, नेहमीच्या उठण्या-बसण्यातले आहेत. यामुळे त्या रात्री नेमके असे काय घडले, ज्यामध्ये त्यांनी मित्राचे अपहरण करून त्याला सिगारेटचे चटके दिले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

वाशी सेक्टर १० परिसरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याचे त्याच्याच मित्रांनी अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात इतरही काहींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. हे सर्वजण १८ ते २० वयोगटातील असून, त्यात काही अल्पवयीन देखील आहेत. 

कुटुंबीयांचे नियंत्रण नव्हते का? तक्रारदार व गुन्हा दाखल असलेले सर्वजण विद्यार्थी असून, त्यांची नेहमीची एकत्र उठबस असायची. त्यापैकी बहुतेक जण अनेकदा मध्यरात्री घरातून बाहेर येऊन एकत्र फिरत असत. यामुळे कुटुंबीयांचे देखील त्यांच्यावर नियंत्रण नव्हते का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. 

 तक्रारदार मुलाचे वडील विद्युत कामाचे ठेकेदार आहेत. यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे असावेत असा त्यांचा समज झाला होता का? की इतर कोणत्या वादाचे कारण त्यामागे आहे? यादृष्टीने तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस