शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

Param Bir Singh: उच्चपदस्थ अधिकारी गायब कसा होऊ शकतो?; परमबीर सिंह यांच्या फरार होण्यावर चांदीवाल आयोगाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 10:04 AM

परमबीर सिंह यांनी ज्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचा दावा केला, त्या रुग्णालयात व अन्य ठिकाणी परमबीर सिंह यांच्याबाबत चौकशी केली.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे देश सोडून गेल्याच्या चर्चेनंतर चांदीवाल आयोगाने याबाबत आश्चर्य व्यक्त केले. एक उच्चपदस्थ अधिकारी गायब कसा होऊ शकतो? असा सवालही आयोगाने बुधवारी उपस्थित केला. परमबीर सिंह मलबार हिल येथील सरकारी निवासात राहत असल्याचे अधोरेखित करत चांदीवाल आयोगाने त्यांच्या अनुपलब्धतेबाबत शंका व्यक्त केली. बुधवारच्या सुनावणीत सीआयडीने परमबीर सिंह यांच्यासंदर्भात एक अहवाल आयोगापुढे सादर केला.

परमबीर सिंह यांनी ज्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचा दावा केला, त्या रुग्णालयात व अन्य ठिकाणी परमबीर सिंह यांच्याबाबत चौकशी केली. पण, त्यांचा पत्ता कुठेही लागला नाही, असे सीआयडीने अहवालात म्हटले आहे. सीआयडीच्या या अहवालानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांच्या वकिलांनी परमबीर सिंह यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट काढण्याची विनंती आयोगाला केली. तसा अर्ज आयोगापुढे सादर केला. 

हा अर्ज करण्यात आल्यानंतर सिंह यांचे वकील अनुकूल सेठ यांनी आयोगाला सांगितले की, जोपर्यंत सिंह यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढले जात नाही आणि त्याची अवज्ञा केली जात नाही, तोपर्यंत अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकत नाही. तर, योग्य कारणमीमांसा करणारे प्रतिज्ञापत्र सादर केल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे चांदीवाल आयोगाने स्पष्ट केले. त्यावर सेठ यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाकडून काही दिवसांची मुदत मागितली. आयोगाने ती मुदत देत न्यायालयाने पुढील सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी ठेवली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याच्या तपासासाठी  गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांची बुधवारी पुन्हा ५ तास चौकशी करण्यात आली. बदलीच्या अनुषंगाने देशमुख यांनी त्यावेळी दिलेल्या सूचनांबाबतची कागदपत्रे अधिकाऱ्याकडे सादर केल्याचे समजते. गेल्या बुधवारी त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने त्यासंबंधी कागदपत्रे जमा करून घेतली.

 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंग