शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुनावळेत टोळक्याची दहशत ; घरातील साहित्य, वाहनांची तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:37 IST

सिगारेट उधार मागितली, दुकानदाराने नकार दिला. त्यामुळे रागाने जात एकाने दुकानदाराच्या घरात शिरून साहित्याची तोडफोड केली.

ठळक मुद्देवाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : सिगारेट उधार मागितली, दुकानदाराने नकार दिला. त्यामुळे रागाने जात एकाने दुकानदाराच्या घरात शिरून साहित्याची तोडफोड केली. तसेच हातात तलवारी घेऊन आलेल्या टोळक्याने घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा फोडत बोरगेवाडी, पुनावळे येथे दहशत माजविली. ही घटना सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी सागर भरत बोरगे (वय २८) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बोरगे यांनी फिर्याद दिली आहे. सुधीर शिवाजी लिंबकर या प्रमुख आरोपीसह अमित पाटोळे, योगेश धुमाळ, टिंकू मिश्रा, तुकाराम व एक अनोळखी इसम (रा. पुनावळे, ओव्हाळवस्ती ) यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची सविस्त माहिती अशी, सागर बोरगे यांचे बोरगेवाडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. रात्री दहाच्या सुमारास सुधीर लिंबकर दुकानात येऊन सिगारेट उधार मागू लागले. दुकानदार सागर यांनी त्यांना सिगारेट देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडुन आरोपी लिंबकर याने दुकानदारास शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता रात्री पावणेबाराच्या सुमारास सागर यांच्या घरी येऊन आरोपीने त्यांच्या दरवाजावर लाथा मारल्या. खिडकीच्या काचा फोडल्या. दरवाजा उघडून पाहिले तर सुधीर हातात तलवार घेऊन उभा होता. तूला आता जिवंत सोडणार नाही, असे धमकावले.  घरात शिरून घरातील साहित्याचे नुकसान केले. घरातील साडेचार हजार रुपए घेतले. त्याचवेळी आरोपी सुधीर याचे साथीदार अमित पाटोळे, योगेश धुमाळ, टिंकू मिश्रा, तुकाराम आणि आणखी एक साथीदार हातात तलवारी घेऊन परिसरात आले. दुकानदार सागर यांच्या घराजवळील मोटारीच्या काचा फोडल्या. रागाच्या भरात केवळ दुकानदाराच्या मोटारीचेच नव्हे तर त्या ठिकाणी उभ्या केलेल्या दोन दुचाकी आणि एका टेम्पोचे नुकसान केले. यामध्ये परवेझ शेख यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. परिसरात दहशत माजवुन टोळके तीन दुचाकीवरून पळून गेले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस