शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

हॉटेल कामगाराची डोक्यात दगड टाकून हत्या; एक संशयित अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:13 PM

ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्ट्रीट क्राइमसह खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे एकापाठोपाठ घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे.

ठळक मुद्देमध्यरात्री घडला भांडीबाजारात प्रकार

नाशिक : शहर व परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात येत नसून अंबड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाला आठवडा उलटत नाही, तोच पुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडीबाजार परिसरातील बालाजी कोट येथे एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात दगड टाकून मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. ९) पहाटे उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवक गस्तीवरील पोलीस पथकाला आढळून येताच तत्काळ घटनास्थळी पोलिसांचा लवाजमा दाखल झाला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी एका संशयिताला अवघ्या दोन तासांत अटक केली आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्ट्रीट क्राइमसह खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे एकापाठोपाठ घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. बालाजी कोट परिसरात गुरुवारी मध्यरात्री सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक गस्तीदरम्यान बालाजी कोट मंदिर परिसरातून जात असताना रक्तबंबाळ मृतावस्थेत त्यांना एक पुरुष आढळला. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र कदम तत्काळ घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. अवघ्या काही मिनिटांत सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पंचवटीचे डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह गुन्हे शाखांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली अशा तीनही पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनी तत्काळ या खुनामागील संशयितांच्या शोधासाठी तपासचक्रे फिरवून शहर व परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.यावेळी भांडीबाजारातील हॉटेल राजहंसमधील कामगाराचा मृतदेह असल्याची माहिती समोर आल्यानंतर हॉटेलमालक रमेश निकम यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली असता अनिल गायधनी (५०) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. दरम्यान, दोन तासांत पोलिसांनी या खून प्रकरणात संशयित शुभम महेश मोरे (२२, रा. सराफबाजार) यास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे ताब्यात घेतले असून, त्याचे काही साथीदारदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPolice Stationपोलीस ठाणेArrestअटक