शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अघोरीपणाचा कळस! आजारी बालकाच्या पोटावर गरम विळ्याचे चटके; मेळघाटातील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 4:08 PM

चिमुकल्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु; भुमकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

- नरेंद्र जावरेचिखलदरा (अमरावती) : पोटफुगीवर उपचार म्हणून दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी  चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावात उघडकिस आला.  या घटनेमुळे पुन्हा एकदा मेळघाटात आदिवासीवर अंधश्रद्धेचा पगडा भारी  दिसून आले आहे. तर मागील दोन महिन्यातली ही चौथी घटना आहे. दुसरीकडे सकाळपासून विविध वृत्तवाहिन्यांनी त्या बालकाचा मृत्यू झाल्याच्या खोटे वृत्त प्रसारित केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

  दिवेश राजू अखंडे (दोन वर्ष, रा. लवादाब) असे या चिमुकल्याचे नाव असून त्याला 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेमाडोह येथील भूमकाने गरम विळ्याचे चटके दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारांच्या तपासणीत पुढे आली आहे. यासंदर्भात  आरोग्य विभागातर्फे पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू झाली होती. बालका डंबे दिल्यानंतर गंभीर आजारी झाल्याने आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर  तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांनी लोकमत'शी बोलताना दिली.

सोशल मीडियावर मृत्यूच्या बातम्या पोटावर डंबे दिलेल्या या दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या विविध वृत्तवाहिनीने सकाळपासून दाखविल्या  तर सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात वायरल करण्यात आल्या प्रत्यक्षात लोकमत'ने माहिती घेतली असता तो चिमुकला सुस्थीतीत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे तर त्याच्या पालकांनी नागपूर जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहेअघोरी  प्रथेचा पगडा भारी  जून महिन्यात तीन मुलाच्या पोटावर गरम विळ्याने  पोटावर डंबा  देण्यात आल्याचा प्रकार लोकमत'ने उघडकीस आणला होता त्यानंतर पुन्हा ही अघोरी प्रथा मेळघाटात सुरूच आहे (फोफसा)पोट फुगी   अंधश्रद्धेतून पोटफुगीवर हे डंबे दिल्या गेलेत उपचार  तालुक्यातील  बिहाली उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या लवादा गावातील दिवेश राजू अखंडे या दोन वर्षांच्या चिमुकल्याचे पोट फुगले होते त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी सेमाडोह येथे भूमका कडे पोटावर गरम चटके (डंबा) देण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी दिली तर यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले

 लवादा येथील दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम  विळ्याचे चटके दिल्याने  जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार सुरु आहे श्यामसुंदर निकम जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती

टॅग्स :Melghatमेळघाटhospitalहॉस्पिटल