अघोरीपणाचा कळस! आजारी बालकाच्या पोटावर गरम विळ्याचे चटके; मेळघाटातील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:08 PM2020-09-01T16:08:54+5:302020-09-01T16:13:01+5:30

चिमुकल्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु; भुमकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

Hot Fork clicks on the stomach of a sick child in MelGhat | अघोरीपणाचा कळस! आजारी बालकाच्या पोटावर गरम विळ्याचे चटके; मेळघाटातील कृत्य

अघोरीपणाचा कळस! आजारी बालकाच्या पोटावर गरम विळ्याचे चटके; मेळघाटातील कृत्य

googlenewsNext

- नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : पोटफुगीवर उपचार म्हणून दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी  चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावात उघडकिस आला.  या घटनेमुळे पुन्हा एकदा मेळघाटात आदिवासीवर अंधश्रद्धेचा पगडा भारी  दिसून आले आहे. तर मागील दोन महिन्यातली ही चौथी घटना आहे. दुसरीकडे सकाळपासून विविध वृत्तवाहिन्यांनी त्या बालकाचा मृत्यू झाल्याच्या खोटे वृत्त प्रसारित केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

  दिवेश राजू अखंडे (दोन वर्ष, रा. लवादाब) असे या चिमुकल्याचे नाव असून त्याला 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेमाडोह येथील भूमकाने गरम विळ्याचे चटके दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारांच्या तपासणीत पुढे आली आहे. यासंदर्भात  आरोग्य विभागातर्फे पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू झाली होती. बालका डंबे दिल्यानंतर गंभीर आजारी झाल्याने आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर  तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांनी लोकमत'शी बोलताना दिली.


सोशल मीडियावर मृत्यूच्या बातम्या 
पोटावर डंबे दिलेल्या या दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या विविध वृत्तवाहिनीने सकाळपासून दाखविल्या  तर सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात वायरल करण्यात आल्या प्रत्यक्षात लोकमत'ने माहिती घेतली असता तो चिमुकला सुस्थीतीत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे तर त्याच्या पालकांनी नागपूर जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे

अघोरी  प्रथेचा पगडा भारी
  जून महिन्यात तीन मुलाच्या पोटावर गरम विळ्याने  पोटावर डंबा  देण्यात आल्याचा प्रकार लोकमत'ने उघडकीस आणला होता त्यानंतर पुन्हा ही अघोरी प्रथा मेळघाटात सुरूच आहे (फोफसा)पोट फुगी   अंधश्रद्धेतून पोटफुगीवर हे डंबे दिल्या गेलेत उपचार  तालुक्यातील  बिहाली उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या लवादा गावातील दिवेश राजू अखंडे या दोन वर्षांच्या चिमुकल्याचे पोट फुगले होते त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी सेमाडोह येथे भूमका कडे पोटावर गरम चटके (डंबा) देण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी दिली तर यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले


 लवादा येथील दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम  विळ्याचे चटके दिल्याने  जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार सुरु आहे
 श्यामसुंदर निकम 
जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती

Web Title: Hot Fork clicks on the stomach of a sick child in MelGhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.