Hooligan attack on ‘Gogi’ of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah; Threatened to kill | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या ‘गोगी’वर गुंडांचा हल्ला; जीवे मारण्याची दिली धमकी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या ‘गोगी’वर गुंडांचा हल्ला; जीवे मारण्याची दिली धमकी

ठळक मुद्देही पहिलीच वेळ नाही तर याआधीही समयवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, आईचा दावासमयच्या नातेवाईकांनी पोलिसात याबाबतची तक्रार केली आहे. शुटींगवरुन परतल्यानंतर ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली.सीसीटीव्हीत गुंडाचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे

मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘गोगी’वर गुंडांच्या टोळक्यांनी हल्ला केला आहे. गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शहा याच्यावर राहत्या घराजवळ गुंडांनी हल्ला केला आहे. हा हल्ला त्यांच्या इमारतीच्या आवारात झाला. समय शहाला मागील काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी मिळत होती, त्यानंतर समयवर त्याच्या बिल्डिंगच्या आवारात काही गुंडांनी एकत्र येत हल्ला केला.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही समयवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता असं त्याच्या आईने सांगितले. आईचा दावा आहे की, काही गुंड इमारतीच्या आवारात घुसले, त्यांनी समयवर हल्ला केला. याचा जाब विचारला असता गुंडांनी अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. समयसोबत ही तिसरी घटना घडल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. समयच्या नातेवाईकांनी पोलिसात याबाबतची तक्रार केली आहे. शुटींगवरुन परतल्यानंतर ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली.

अनेक दिवसांपासून समयला मारण्याची धमकी मिळत होती, त्याबाबत बोरिवली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समयच्या घराजवळ एक गुंड येऊन समयबद्दल वारंवार विचारत होता. कधी कधी गुंडांची टोळकी येऊन इमारतीच्या खाली उभं राहून शिवीगाळ करत असे. हे लोक कोण आहेत याची समयला माहिती नाही. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. समयची आई नीमा शहा म्हणाल्या की, कोरोनामुळे समयच्या गाडीचा ड्रायव्हर नसल्याने त्याला प्रायव्हेट कॅबने जावं लागतं. त्यामुळे मला भीती वाटते. सीसीटीव्हीत गुंडाचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे असं त्यांनी सांगितले.

इतकचं नाही तर मागील १५ दिवसातील ही तिसरी घटना आहे, आम्ही इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतो, घरासमोर मुख्य रोड आहे, त्यावरुन रिक्षातून जाताना एकजण जोरजोरात शिवीगाळ करत होता. त्याचा चेहरा दिसला नाही, परत एकेदिवशी हा मुलगा इमारतीच्या परिसरात घुसला आणि ओरडून समयला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. आम्ही त्याच्याकडे गेलो, जाब विचारला परंतु त्याने काही उत्तर न देता शिवीगाळ करू लागला. आता समयवर हल्ला केल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे असं त्याच्या आईने सांगितले.

Web Title: Hooligan attack on ‘Gogi’ of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah; Threatened to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.