शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सैराट! पळून लग्न केलं म्हणून मेहुण्याने भावोजीचं शिर कापलं; बहिणही फासावर लटकलेली दिसली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 17:03 IST

Honour Killing in Jabalpur : पूजाने (१९) १३ डिसेंबर २०२० ला घरातून पळून जाऊन ब्रजेश कश्यप नावाच्या तरूणासोबत लग्न केलं होतं. तेव्हापासूनच पूजाचा भाऊ सूड घेण्यासाठी संधी शोधत होता.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून(Jabalpur) ऑनर किलिंगची(Honour Killing) धक्कादायक घटना समोर आली आहे. खोटी शान जपण्यासाठी एका प्रेमकथेचा दु:खद अंत करण्यात आला. आरोप आहे की, तरूणाने त्याच्या भावोजीची  कुऱ्हाडीने गळा कापून हत्या केली. तर दुसरीकडे बहिणीचा मृतदेह घरात फासावर लटकलेला दिसला. ही घटना गुरूवारी सकाळी ९.३० वाजताची आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

zeenews.india.com ने दिलेल्या वृत्तानुसार, पूजाने (१९) १३ डिसेंबर २०२० ला घरातून पळून जाऊन ब्रजेश कश्यप नावाच्या तरूणासोबत लग्न केलं होतं. तेव्हापासूनच पूजाचा भाऊ सूड घेण्यासाठी संधी शोधत होता. तिलवाराच्या शंकरघाटमध्ये राहणारा मिंटू शिवराम शुक्ला ऊर्फ धीरज(३५) पोलीस स्टेशनमध्ये एक पिशवी घेऊन पोहोचला. ज्यात त्याचा भावोजी ब्रजेश कश्यपचं डोकं होतं. जे पाहून पोलीस हैराण झाले. (हे पण वाचा : खळबळजनक! प्रियकराने लग्नास दिला नकार, तरूणीने त्याला फसवण्यासाठी केली स्वत:च्या बहिणीची हत्या....)

दोघांनी पळून जाऊन केलं होतं लग्न

धीरजला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने ब्रजेश कश्यप(३२) ची रमनगराच्या बर्मन गल्लीत हत्या केल्याचं कबूल केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले तर त्यांना शेतात ब्रजेशचं धड आढळून आलं. ब्रजेशने १३ डिसेंबर २०२० ला धीरजची बहीण पूजाला घरून पळून नेऊन लग्न केलं होतं. पूजाच्या घरातील लोकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी दोघांनाही २७ फेब्रुवारीला शोधून काढलं होतं. (हे पण वाचा : छोट्या भावाने आधी लग्न केले, मोठ्या भावाकडून पती-पत्नीची हत्या)

पूजाचा मृतदेह घरात फासावर

पूजाने घरी जाण्यास नकार दिला होता. ब्रजेश आणि पूजा जबलपूरच्या गढामध्ये भाड्याच्या घरात राहत होते. गुरूवारी तो आपल्या गावी आला होता. यादरम्यान धीरज शुक्लाने त्याची गळा कापून हत्या केली. हत्येच्या काही वेळातच पोलिसांना सूचना मिळाली की गढामध्ये पूजाचा मृतदेह फासावर लटकलेला आहे. आता पूजाने आत्महत्या केली की, तिचीही हत्या झाली याचा पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशHonor Killingऑनर किलिंगCrime Newsगुन्हेगारी