शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:30 IST

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी अनेक नवीन खुलासे झाले आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी अनेक नवीन खुलासे झाले आहेत. शिलाँग पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने स्वतः राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला होता आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबत संपूर्ण घटना घडवून आणली. तपासात असं दिसून आलं आहे की, सोनमचं राज कुशवाहवर खूप प्रेम होतं.

सोनमने राजा रघुवंशीला मारण्यासाठी आधीच प्लॅनिंग केलं होतं. सोनम आणि राज यांनी त्यांच्या तीन मित्रांना आधीच गुवाहाटीला पाठवलं होतं. तिघांनी गुवाहाटीत एक अ‍ॅक्टिव्हा भाड्याने घेतली होती आणि रेकी केली होती. सोनम लोकेशन शेअर करत होती. आकाश, विशाल, आनंद आणि राज यांनी सोनमसोबत मिळून रघुवंशीची हत्या केली.

५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?

नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न

सोनम स्वतः राजा रघुवंशीला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली. त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर सोनम नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. सोनम रात्री प्रवास करायची जेणेकरून कोणीही तिला ओळखू नये. शक्कल लढवून तिने ये-जा करण्यासाठी मुद्दाम रात्रीची वेळ निवडली अशी माहिती समोर आली आहे. राजाची हत्या केल्यानंतर राज, आकाश, विशाल, आनंद आणि सोनम हे सर्वजण शिलाँगहून गुवाहाटीला गेले आणि तिथे एक दिवस राहिले. नंतर ते निघून वेगवेगळ्या ठिकाणी गेले.

सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?

राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्स आनंद, आकाश आणि विकी ठाकूर यांचे फोटो समोर आले आहेत. हनिमूनला गेलेल्या सोनमने आपल्या पतीचा काटा काढला आहे. मेघालय पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथून अटक केली आहे. तर इतर चार आरोपींना मध्य प्रदेशातूनअटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसह मिळून पती राजाच्या हत्येचा कट रचला होता.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक