हनी ट्रॅप स्कँडल : एसआयटीही बुचकळ्यात; कोणत्या कोणत्या नेत्याची इज्जत वाचवायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 07:36 PM2019-10-01T19:36:23+5:302019-10-01T19:41:25+5:30

चौकशी करत असलेल्या एसआयटीसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

Honey Trap Scandal: SIT too in jumple; Which leader to save the honor? | हनी ट्रॅप स्कँडल : एसआयटीही बुचकळ्यात; कोणत्या कोणत्या नेत्याची इज्जत वाचवायची?

हनी ट्रॅप स्कँडल : एसआयटीही बुचकळ्यात; कोणत्या कोणत्या नेत्याची इज्जत वाचवायची?

googlenewsNext
ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीतही नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे व्हिडीओ कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर येत आहे.२८ आमदार, १३ आयएएस, १२ व्यवसायिक, ४ मंत्री, ३ खासदार, ४ पत्रकार आणि एक माजी मुख्यमंत्री हे या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे उघडकीस आले आहे.आरती दयाल हिने ही ब्लॅकमेलिंग गॅंग बनवली होती.

भोपाळ - गेल्या महिन्यात देशातील सर्वात मोठे आणि हायप्रोफाईल 'सेक्स स्कँडल' उघड झाले. यामध्ये मध्य प्रदेशसह देशभरातील मोठमोठे राजकीय नेते, बडे अधिकारी, पत्रकार, व्यवसायिक, कंत्राटदार अडकलेले आहेत. या टोळीकडून केवळ कंत्राटे, खंडणी उकळण्याचीच कामे करण्यात आलेली नसून लोकसभा निवडणुकीतही नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे व्हिडीओ कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर येत आहे. मात्र, अश्लील फोटो आणि व्हिडीओ जस जसे बाहेर येऊ लागले तस तसं प्रत्येकासमोर आपली कशी इज्जत वाचवायची हा पेच निर्माण झाली आहे. त्यामुळे चौकशी करत असलेल्या एसआयटीसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

२८ आमदार, १३ आयएएस, १२ व्यवसायिक, ४ मंत्री, ३ खासदार, ४ पत्रकार आणि एक माजी मुख्यमंत्री हे या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे उघडकीस आले आहे.मध्य प्रदेशातील या हनी ट्रॅप प्रकरणामुळे देशातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. यामध्ये भाजपासह अन्य पक्षांतील नेतेही सहभागी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आधी हे प्रकरण केवळ कंत्राटे मिळविण्यासाठी  सेक्स स्कँडल करण्यात आल्याचे पुढे आले होते. मात्र, नंतर या प्रकरणाची व्याप्ती एवढी वाढली की, जवळपास 4 हजार व्हिडीओ क्लीप आणि करोडो रुपयांची खंडणी एवढ्यावर पोहोचली. या हानी ट्रॅपमध्ये लिपस्टिक कव्हर, गॉगल, चष्मे यांद्वारे छुप्या कॅमेऱ्यातून व्हिडीओ बनवले जात होते. आरतीच्या मोबाईलमधून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता असून त्यावर पोलिसांचे लक्ष आहे. आरती दयाल हिने ही ब्लॅकमेलिंग गॅंग बनवली होती. व्हिडिओद्वारेच आरती दयालचे बिंग फुटले. कमी कालावधीत आरतीने उच्चभ्रू परिसरात घर घेतले आणि महागड्या गाड्या देखील खरेदी केल्या. 

Web Title: Honey Trap Scandal: SIT too in jumple; Which leader to save the honor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.