शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:31 IST

Crime News : या आरोपीकडून विविध प्रकारच्या देशी बॉम्बच्या किंमती असलेला संपूर्ण कॅटलॉग पोलिसांना मिळाला असून तो ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता.

कोलकाता : खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची ऑनलाईन डिलिव्हरी (Online delivery)  झालेली तुम्ही ऐकली असेल, पण बॉम्बची होम डिलिव्हरीही होते, असं क्वचितच ऐकलं असेल. मात्र, आता बंगालमध्ये बॉम्ब खरेदी-विक्रीच्या ऑनलाईन व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश (Police Busted)  केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून मकबूल शेख असे त्याचे नाव आहे. या आरोपीकडून विविध प्रकारच्या देशी बॉम्बच्या किंमती असलेला संपूर्ण कॅटलॉग पोलिसांना मिळाला असून तो ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. करार निश्चित झाल्यावर बॉम्ब ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्यात आले. पेमेंटही ऑनलाईन करण्यात झाले.काटव्यातून अवैध धंदे सुरू होतेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या शौचालयाच्या छतावरून अनेक बॉम्बही सापडले आहेत. ही घटना पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा भागातील आहे, जिथून त्याला अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. कटवा येथूनच हा अवैध धंदा चालवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या टोळीत आणखी कोण-कोण सामील आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशय, पतीने नातेवाईकाची केली हत्या 

प्रियकराने प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावले, बलात्कारानंतर हत्या करून झाडाला लटकवला मृतदेह

बॉम्बच्या होम डिलिव्हरीमुळे पोलिसांची तारांबळ उडालीबॉम्बच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या या धंद्याचा बहुधा पहिल्यांदाच पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. याआधीही राज्यात ठिकठिकाणी बॉम्ब आणि शस्त्रे सापडली आहेत, त्यामुळे ममता बॅनर्जी सरकारही विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सरकारला घेरले आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांनी टोला लगावत राज्य सरकारद्वारे कार्यक्रम चालवत असल्याचे म्हटले आहे. दारात शिधापाठोपाठ आता बंगालमध्येही बॉम्ब पोचू लागले आहेत.

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील बोगटूई येथे झालेल्या हत्याकांडाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) बेकायदेशीर बॉम्ब आणि बंदुक जप्त करण्यासाठी देशव्यापी शोध मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासून पोलीस सातत्याने मोहीम राबवत आहेत.

 

 

टॅग्स :Bombsस्फोटकेwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसArrestअटकMobileमोबाइल