शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:14 IST

अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण आणि छळ करण्यात आल्याचे येकरने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. दीर्घकाळापर्यंतचा अपमान, दबाव आणि धमक्यांमुळे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे.

अरुणाचल प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोघांच्या आत्महत्येप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी  टी. पोटोम यांना अटक केली. दिल्ली सरकारमधील विशेष सचिव पोटोम यांनी आज सकाळी निर्जुली पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यांना अटक केली,  गुरुवारी प्रकरण उघड झाल्यापासून ते बेपत्ता होते, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली होती.

घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...मिळालेल्या माहितीनुसार, पोटोम हा भारतीय दंड संहिता (BNS) २०२३ च्या अनेक तरतुदींनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात हवा होता, यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारी गैरवर्तन यांचा समावेश आहे. हा खटला गोमचू येकर या तरुण मल्टी-टास्किंग स्टाफ मेंबरच्या मृत्यूशी संबंधित आहे, त्याने २३ ऑक्टोबर रोजी निर्जुली येथील लेखी गावात त्याच्या भाड्याच्या घरात आत्महत्या केली.

छळ आणि जबरदस्तीचे आरोप

आत्महत्या केलेल्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. यामध्ये ग्रामीण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोटोम आणि लिकवांग लोवांग या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छळ आणि जबरदस्तीचा आरोप केला आहे. 'लोवांग यांनीही त्याच दिवशी लोंगडिंग जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली. पोलिसांनी सुरुवातीला निर्जुली पोलिस ठाण्यात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. अनेक सुसाईड नोट्स सापडल्या आहेत, यामध्ये येकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असल्याचा दावा केला आहे.

सुसाईड नोटमध्ये एचआयव्हीचा उल्लेख

आत्महत्या केलेल्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. यामध्ये लैंगिक शोषण आणि छळ बराच काळ चालू होता असे म्हटले आहे. दीर्घकाळापर्यंतचा अपमान, दबाव आणि धमक्यांमुळे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्या चिठ्ठीत जिव्हाळ्याचे संबंध आणि फसवणूक यासह विविध आरोप केले आहेत. एचआयव्ही झाला आहे आणि एका अधिकाऱ्याने सोडून दिले आहे आणि ब्लॅकमेल केले आहे, असा दावा या चिठ्ठीमध्ये केला आहे. त्यांना १ कोटी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, हे नंतर पूर्ण झाले नाही. जर मी मेलो तर ते अधिकाऱ्यामुळे होईल. कृपया मला न्याय द्या, असंही या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Arunachal Rocked: HIV Racket, Suicides, IAS Officer Arrested – Full Story

Web Summary : Arunachal Pradesh faces turmoil with an HIV racket exposed after two suicides. IAS officer T. Potom arrested for abetment. Suicide notes reveal allegations of harassment, financial deceit, and blackmail, implicating senior officials in the tragic events. Investigation underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश