रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 03:45 PM2022-01-22T15:45:29+5:302022-01-22T15:45:59+5:30

या अपघाताची नोंद केळवे सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून त्यांचा पुढील तपास सुरु आहे.

Hit a truck parked on the road by a two-wheeler; 2 died on the spot | रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Next

हितेंन नाईक   

पालघर - एडवण जवळील भादवे येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्या ट्रकला पाठीमागून मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात एडवण येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली.

एडवण च्या भोला शंकर मंडळ येथील गणेश वामन वैती(वय 45 वर्ष)आणि दिपेश जयवंत तरे(वय 35वर्ष) हे दोन मित्र सफाळे जवळील रामबाग येथील अमेटी लेदर इंटरनॅशनल कंपनीत काम करीत होते.शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून काम आटोपून दोघेही नेहमी प्रमाणे आपल्या मोटारसायकली वरून आपल्या घराकडे निघाले होते.हे दोघेही भादवे जवळ आले असताना संतोष पाटील ह्यांच्या मालकीचा एक ट्रक बंद अवस्थेत रस्त्यावर उभा होता.ह्यावेळी ह्या ट्रक ला साईड सिग्नल अथवा कुठलेही मार्गदर्शक चिन्ह न लावता चालक जावेद मोहमद शेख यांनी आपला ट्रक उभा केल्याने अंधारात ह्या उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने मोटारसायकल ने ट्रकला मागून जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की ह्या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.हे दोन्ही तरुण आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते होते.त्याच्या अश्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद केळवे सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सफौ.गवई हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Hit a truck parked on the road by a two-wheeler; 2 died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app