शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला तरुणीने लगावली कानशिलात; Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 09:37 IST

Girl made video of doctor resting on duty : ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला एका तरुणीने कानशिलात लगावल्याची घटना समोरर आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी देखील रात्रं-दिवस काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला एका तरुणीने कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या हिसारमध्ये ही घटना घडली आहे. एका रुग्णालयात तरुणी आणि एक तरुण आपल्या नातेवाईकाला उपचारासाठी घेऊन आले होते. 

रुग्णावर वेळेत उपचार होणं गरजेचं होतं. मात्र खूप वेळ झाला तरी कोणताच डॉक्टर रुग्णालयात दिसत नव्हता. बराच वेळ या तरुणीने डॉक्टरांबद्दल विचारणा केली. मात्र कोणीच आलं नाही. शेवटी आपत्कालीन विभागाजवळ एका खोलीत डॉक्टर आणि दुसरी एक व्यक्ती झोपलेलं असल्याचं दिसलं. तरुणीने हा सगळा घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरुणी ज्या व्यक्तीसोबत बोलत आहे, तो ड्यूटीवर आराम करीत आहे. तर दुसरीकडे एक व्यक्ती बेडवर अंगावर पांघरून झोपली आहे. यानंतर तरुणी आणि डॉक्टरांमध्ये वाद झालेला पाहायला मिळतो. 

ड्यूटीवर असताना तुम्ही कसे काय झोपता? असा सवाल तरुणीने डॉक्टरांना केला आहे. त्यानंतर रागाच्या भरात डॉक्टर ओपीडी रुममध्ये आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. तरुणी डॉक्टरचा व्हिडीओ अनिल विज याला पाठविण्याची धमकी देते. ज्यानंतर डॉक्टर तरुणीचा मोबाइल खेचून घेतो. तरुणी डॉक्टरला फोन परत देण्यास सांगते. मात्र तो फोन देण्यास नकार देतो. यानंतर फोन खेचाखेचीमध्ये तरुणी डॉक्टरच्या कानशिलात लगावते. डॉक्टरचं हे कृत्य मोबाईलमध्ये कैद झालं आहे आणि हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

डॉक्टराने आपल्या कर्मचाऱ्यांसह ओपीडीचा बहिष्कार करीत तरुणीवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला आहे. ज्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि सोबत आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. डीएसपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला रुग्णाला घेऊन तरुणी रुग्णालयात आली होती. मात्र त्यांनी डॉक्टरांसोबत गैरवर्तन केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या एकाला अटक करण्यात आली असून ते याचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Haryanaहरयाणाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसIndiaभारत