शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हायप्रोफाइल खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV तून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 10:42 IST

Dhanbad Judge Death : झारखंड पोलिसांनी सात पथकांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी दिली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्या अँगलने तपास सुरू आहे.

धनबाद: एका हायप्रोफाइल खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा रस्ते अपघातात बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली. पण, आता पोलिसांच्या हाती लागलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकवर निघालेले जिल्हा सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांचा मृत्यू अपघातात झाला नसून, त्यांना एका ऑटोने मुद्दामून धडक दिल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. 

माजी आमदाराच्या जवळचा असलेल्या रंजय हत्याकांडासारख्या अनेक महत्वाच्या खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्या अँगलने तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी जातीने याप्रकरणात लक्ष्य देत असून, दोषींना लवकर पकडले जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, धनबादच्या स्थानिक आमदाराने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सीसीटीव्हीमध्ये नेमंक काय आहे ?धनबादच्या जिल्हा सत्र न्यायालयातील न्‍यायाधीश उत्तम आनंद बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. शहरातील रणधीर वर्मा चौकाजवळ एका ऑटोने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. सुरुवातीला हा अपघात वाटला होता, पण सीसीटीव्हीत दिसले की, रस्त्याने सरळ जाणारा ऑटो मुद्दामून किनाऱ्याने चालणाऱ्या उत्तम आनंद यांना धडक देत आहे. आता पोलिस या प्रकरणाचा हत्येच्या अँगलने तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडdhanbad-pcधनबाद