शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हाय अलर्ट! दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याच्या कटाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 18:31 IST

High Alert in delhi : तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कार आणि ट्रकमध्ये बॉम्ब, बंदुका तसेच स्टिकी बॉम्बचा वापर करू शकतात.

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षा यंत्रणांना 15 ऑगस्टपूर्वी एक मोठा इंटेलिजन्स अलर्ट मिळाला असून, त्यानुसार दहशतवादी अनेक संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करू शकतात. यादरम्यान दहशतवादी अनेक हल्ल्याचा कट आखू शकतात. तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कार आणि ट्रकमध्ये बॉम्ब, बंदुका तसेच स्टिकी बॉम्बचा वापर करू शकतात.

ही शस्त्रे वापरली जाऊ शकतातदहशतवादी हल्ल्यासाठी स्फोटक बॉम्बस्फोट आणि आग लावणारा बॉम्बस्फोट (जसे की मोलोटोव्ह कॉकटेल) वापरू शकतात. यासोबतच ते पार्सल बॉम्बचाही वापर करू शकतात. लोकांमध्ये दहशत आणि नरसंहार पसरवण्यासाठी बंदुका, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, रायफल आणि स्वयंचलित शस्त्रे आणि आरपीजी यांचा वापर केला जाऊ शकतो.पीओकेमध्ये दहशतवादी कसरत करत आहेतविविध प्रकारच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी तसेच इतर दिवशीही सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरापासून ते लाँचिंग पॅड्स आणि दहशतवाद्यांची घुसखोरी ही बाब समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टनुसार, दहशतवादी ड्रोनद्वारे भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी ते पीओकेमध्ये ड्रोनला लक्ष्य करण्याचा सराव करत आहेत. मेटल डिटेक्टरला चकमा देण्यासाठी अतिरेकी अत्याधुनिक आयईडीचा वापर करून मोठा गुन्हा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एजन्सीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध आंतरराष्ट्रीय सीमेवरील त्यांच्या स्लीपर्स सेलमध्ये ड्रोनद्वारे दारूगोळा पोहोचवण्याचे काम करत आहे.अज्ञात वस्तूंना स्पर्श करणे टाळासुरक्षा यंत्रणांनी जारी केलेल्या अलर्टमध्ये कोणत्याही बेवारस वस्तूला स्पर्श करणे टाळावे, तसेच बॉम्ब आढळल्यास तो निकामी करताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.हवेत उडणाऱ्या उपकरणांद्वारे हल्ला केला जाऊ शकतोइंटेलिजन्स अलर्टमध्ये पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँग ग्लायडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली ऑपरेटेड एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, लहान आकाराच्या बॅटरीवर चालणारे विमान, क्वाडकॉप्टर आणि पॅरा जंपिंगवर बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणांवर हल्ला होऊ शकतोदहशतवाद्यांचा एक गट PoK मधील Kotil (KOTIL) नावाच्या लॉन्चिंग पॅडवरून देशात घुसखोरी करू शकतो, तर दुसरा PoK मधील Datote (DATOTE) नावाच्या लॉन्चिंग पॅडवरून देशात घुसखोरी करू शकतो. तिसरा बंगाल, चौथा राजस्थान आणि पंजाब आणि पाचवा ईशान्येतून दिल्ली आणि लगतच्या राज्यांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.सुरक्षा वाढवण्यात आली दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर सखोल तपास सुरू करण्यात आला आहे, तसेच शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीdelhiदिल्ली