शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हाय..ss हाय..ss! तृतीयपंथीयांचा पोलीस ठाण्यात हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:05 IST

Robbery Case : चोरी प्रकरणात संशयितांची नावे देऊनही तपास न आरोप 

ठळक मुद्देआपल्या नेहमीच्या हाय..ss हाय..ss अशा शैलीने निषेध सुद्धा व्यक्त केला. या बाबीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. 

मलकापूर : एका तृतीयपंथीयांच्या घरी चोरीची घटना घडली. तक्रारी दरम्यान संशयितांची नावेही सांगण्यात आली परंतु त्या दिशेने तपास करण्यात येत नसल्याचा आरोप करीत  तृतीयपंथीयांनी एकजूट होत मलकापूर शहर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल केला. दरम्यान आपल्या नेहमीच्या हाय..ss हाय..ss अशा शैलीने निषेध सुद्धा व्यक्त केला. या बाबीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. 

शहरातील पंत नगरमध्ये राहत असलेली मोगराबाई यांच्याकडे ७ मे रोजी रात्री दोन वाजताच्या दरम्यान काही लोकांनी घरात घुसून घरातील लोकांना धाक दाखवत रोख ५० हजार रुपये, बँक पासबुक, आधारकार्ड आणि दागिने असा पाच लाखापर्यंत ऐवज लुटून नेला, अशी तक्रार पोलिसात दिली होती. त्यावेळी काही संशयितांची नावे सुद्धा सांगितले होती. त्या दिशेने पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करीत फिर्यादी मोगराबाई यांनी ही बाब विदर्भातील तृतीयपंथी समाजाच्या कानावर टाकली. १७ मे रोजी नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव खान्देश या जिल्ह्यातील काही किन्नरांनी मलकापूर गाठले.

मोगराबाईच्या तक्रारीनुसार तपास करण्याची करण्याची मागणी केली. दरम्यान जमलेल्या तृतीयपंथीयांनी कपडे काढून पोलीस स्टेशनचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केली. एवढेच नव्हे तर काही तृतीयपंथीयांनी आपले कपडे काढण्याचे प्रयत्न करताच पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. एक तास चाललेल्या या गोंधळात पोलिसांना सर्वांची समजूत काढावी लागली. त्यामुळे प्रकरण शांत झाले. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात चर्चा रंगू लागली. पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर सुद्धा या प्रकरणाने चांगलेच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

टॅग्स :RobberyचोरीTransgenderट्रान्सजेंडरPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलMalkapurमलकापूर