शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
2
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
3
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
4
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
5
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
6
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
7
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
8
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
9
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
10
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
11
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
12
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
13
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
14
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
15
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
16
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
17
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
18
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
19
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
20
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तब्बल 7.5 कोटींच्या बांगड्या, तस्करीसाठी लढवली अनोखी शक्कल; अधिकारीही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 08:29 IST

heroin worth 75 crore smuggled in bangles seized at delhi airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तब्बल साडे सात कोटी रुपयांचं हेरोइन जप्त केलं आहे.

नवी दिल्ली - विमानतळावर तस्करी करताना पकडले जाऊ नये यासाठी वेगवेगळी शक्कल हमखास लढवली जाते. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. दिल्लीतील (Delhi Airport) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तब्बल साडे सात कोटी रुपयांचं हेरोइन जप्त (Heroin) केलं आहे. आरोपीने तस्करी करण्यासाठी ज्या पद्धतीचा उपयोग केला आहे, ते पाहून अधिकारी देखील हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. साडे 7 कोटी रुपयांचं हेरोइन जप्त करण्यात आलं असून याचं वजन 18 किलोग्रॅम आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे हेरोइन बांगड्यांमध्ये भरण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जप्त केलेले ड्रग्ज आफ्रिकेतून दिल्लीला एका पत्त्यावर पाठवले जात होते. गेल्या आठवड्यात दिल्ली एअरपोर्टवर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन दक्षिण आफ्रिकी नागरिकांना पकडलं होतं आणि त्यांच्याकडून 126 कोटींची हेरोइन जप्त केली होती. याचं वजन 18 किलो इतकं होतं. या दोन्ही प्रकरणात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे आरोपी 27 जून रोजी जोहन्सबर्गहून दोहा मार्गाने हेरोइन घेऊन येथे पोहोचले होते. आरोपींनी हेरोइन दोन बॅगेत लपवले होते. 

तपासादरम्यान आरोपीच्या एका बॅगेतून 10 किलो तर दुसऱ्याच्या बॅगेतून 8 किलो हेरोइन जप्त करण्यात आलं. सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना ग्रीन चॅनल पार करताना आणि आंतरराष्ट्रीय आगमन हॉलच्या एग्जिट गेटजवळ पोहोचल्यानंतर पकडण्यात आलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आपल्या पत्नीपासून दूर राहण्यासाठी एका पतीने अनोखी शक्कल लढवली. थेट खोटा 'कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट' तयार केला. कोरोनाचा रिपोर्ट पत्नीला पाठवला आणि आपण कोविड सेंटरमध्ये भरती असल्याचं सांगितलं. मात्र त्याचं हे खोटं फार दिवस लपून राहिलं नाही. शेवटी पत्नीला सत्य समजलं आणि नवऱ्याची पोलखोल झाली. 

बापरे! पत्नीपासून दूर राहण्यासाठी पतीने तयार केला खोटा 'कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट' पण अशी झाली पोलखोल

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नीपासून दूर राहण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट तयार करून घेतला आणि पत्नीला आपण उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल असल्याचं देखील सांगितलं. एक महिन्याहून जास्त दिवस झाले तरी पती घरी परत आला नाही. त्यामुळे पत्नीला त्याच्यावर संशय आला. तिने आपल्या वडिलांना या कोरोना रिपोर्टची सत्यता तपासून पाहायला सांगितली. सासऱ्याने जावयाचा रिपोर्ट ज्या लॅबमधून काढला गेला होता तिथे चौकशी केली. अधिक चौकशी केली असता हा रिपोर्ट खोटा असल्याचं समोर आलं. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीIndiaभारत