शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर उकळतं तेल ओतून जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 19:10 IST

जखमी पतीला मुंईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

ठळक मुद्दे भविष्य भु-हागोहा असं जखमी पतीचं नाव असून क्विन्सीया भु-हागोहाय असं पत्नीचं नाव आहे.वसई पश्चिमेकडील उमेळमान परिसरातील प्रतापगड या इमारतीत ही घटना घडली आहे.

वसई - मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर उकळतं तेल ओतून जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना वसई पश्चिम परिसरात घडली आहे. पतीचे पाय बांधले आणि अंगावर उकळतं तेल टाकत, डोळ्यात मिरची पूड, डोक्यावर हातोडीने वार करून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. माणिकपूर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्राला ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच पुढे कांबळे म्हणाले की, जखमी पतीला मुंईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे. भविष्य भु-हागोहा असं जखमी पतीचं नाव असून क्विन्सीया भु-हागोहाय असं पत्नीचं नाव आहे.वसई पश्चिमेकडील उमेळमान परिसरातील प्रतापगड या इमारतीत ही घटना घडली आहे. कौटुंबिक भांडणातून क्विन्सीयाने आपल्या पतीला मारहाण करताना उकळतं तेल त्याच्या अंगावर आणि डोळ्यात फेकलं. तसेच हातोडीने डोक्यावर वार केले. घरात मिळेल त्या सामानाने त्याला मारहाण केली. त्याचे पाय रस्सीने बांधून त्याला टॉयलेटमध्ये ठेवलं होतं.जखमी भविष्यनं जीव वाचवण्यासाठी प्रेशर कुकर आणि स्पीकर हे किचनच्या खिडकीतून बाहेर फेकल्यावर आजूबाजूचे रहिवाशी त्याच्या रुममध्ये पोहचले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले.  ही सर्व मारहाण होत असताना त्यांची दोन लहान जुळी मुलं देखील घरी होती. या प्रकरणी पत्नी क्विन्सीया भु-हागोहाय आणि तिचा मित्र सतवीर नायक याला पोलिसांनी अटक केली आहे. कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून पतीच्या म्हणण्यानुसार नायक हा पत्नीचा मित्र आहे तर पत्नीच्या म्हणण्यानुसार नायक हा पतीचा मित्र आहे. क्विन्सीया ही ख्रिश्चन तर भविष्य हा मूळ आसामचा रहिवाशी आहे. या दोघांनीही आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. भविष्य हा मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. ते वसईच्या उमेळमान परिसरातील प्रतापगड या सोसायटीमध्ये भाड्यानं राहतात. त्यांना दोन लहान जुळी मुलं आहेत. भविष्यला पोलिसांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक होती असून सध्या स्थिर असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVasai Virarवसई विरार