शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

हॅलो, वेतनासाठी लस प्रमाणपत्र हवे? द्या पाचशे, मोबाइलवर खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:53 IST

Corona Vaccination: ज्याला कोणाला लस घ्यायची नसेल,  त्यांना माझा एक मित्र ऑपरेटर शासनाच्या वेबसाईटवरून प्रमाणपत्र देतो.’ फोनवर येत असलेल्या या खुल्या ऑफरमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

- नरेंद्र जावरेपरतवाडा (जि. अमरावती) : ‘हॅलो, नमस्कार. लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहिजे का? पाचशे रुपयात मिळेल. पगारासाठी आवश्यक आहे. ज्याला कोणाला लस घ्यायची नसेल,  त्यांना माझा एक मित्र ऑपरेटर शासनाच्या वेबसाईटवरून प्रमाणपत्र देतो.’ फोनवर येत असलेल्या या खुल्या ऑफरमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच विविध कार्यालयांत वेतनासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. शासनाची वेबसाईट असली तरी त्याला चालविणारे आरोग्य विभागातील काही ऑपरेटर संगनमताने  प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे ‘मोबाईल कॉलिंग’वर होणाऱ्या संभाषणामुळे पुढे आले आहे.

जवळपास सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वेतनासाठी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुसरीकडे प्रमाणपत्र दिल्यावरच वेतन काढण्याचे फर्मान कार्यालयप्रमुखांनी जारी केले आहे. याचाच फायदा उचलत पाचशे रुपयात कोरोना प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा सुरू झाल्याचे पुढे आले आहे. फोनवर पाचशे रुपयांमध्ये कोरोना लसीचे प्रमाणपत्र देण्याचे संभाषण व्हायरल होत आहे.

कोरोना लसीकरण न करता प्रमाणपत्र विकत देणे व घेणे गंभीर बाब आहे. यासंदर्भात आरोग्य विभागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. असे कोणी आढळल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे. 

‘स्वत:लाच धोका करून घेऊ नका’कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. असे प्रमाणपत्र कोणी देत असेल आणि घेत असेल, तर ते स्वतः, कुटुंब आणि देशासाठी धोकादायक आहेत. यासंदर्भात प्रशासनाला तात्काळ माहिती पुरवण्याचे आवाहनदेखील आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती