शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपीसोबत 'तो' पुरावे मिटवेल ! चिंतन उपाध्यायच्या जामिनाला पोलिसांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 04:28 IST

कांदिवलीत घडलेल्या वकील हरीश भांबनी तसेच आर्टीस्ट हेमा उपाध्याय यांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी कारागृहात असलेला तिचा पती चिंतन उपाध्यायने कोरोना पार्श्वभूमीवर जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.

मुंबई : कांदिवलीत घडलेल्या वकील हरीश भांबनी तसेच आर्टीस्ट हेमा उपाध्याय यांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी कारागृहात असलेला तिचा पती चिंतन उपाध्यायने कोरोना पार्श्वभूमीवर जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. कारागृहाबाहेर पडल्यावर तो पुरावे मिटवण्याची शक्यता असल्याचा दावा करत वकील आणि पोलिसांनी दिंडोशी सत्र न्यायालयात याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्यानुसार याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.चिंतनच्या जामीन अर्जावर ३१ आॅगस्ट, २०२० रोजी त्याची सुनावणी झाली. त्यात तपास करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ७ आणि बार असोसिएशनच्या वकिलांनी न्यायालयात सोमवारी आक्षेप नोंदवला. हेमा उपाध्यायचे वकील हरीश भांबानी यांनी कोर्टात तिची बाजू पाहिली होती त्यारागात त्यांची हत्या करवली असे वकिलांचे म्हणणे आहे.त्याला जामीन मंजूर झाला तर बाहेर पडून याप्रकरणी अद्याप पोलिसांच्या हाती न लागलेल्या आरोपीसोबत मिळून पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पोलीस महानिरीक्षक ( कारागृह ) दिपक पांडे यांनीही कारागृहातील कैदी योग्य स्थितीत आहेत असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. यामुळे चिंतनला जामीन मंजूर करण्यात येऊ नये असे न्यायालयाला बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड़ केदार सयानी यांनी सांगितले. याप्रकरणाची सुनावणी ३ सप्टेंबर,२०२० रोजी होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.कांदिवलीच्या पोईसर नाल्यात हेमा आणि हरीश या दोघांचे १२ डिसेंबर, २०१५ रोजी मृतदेह बॉक्समध्ये पॅकिंग अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. यात ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवत जवळपास २ हजार पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले होते.निर्णयाकडे लक्षयातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील हे प्रकरण वर्षभरात आटोपण्यास सांगितले होते. मात्र चिंतन काही न काही कारण सांगत हे प्रकरण पुढे ढकलत होता. सत्र न्यायालय चिंतनबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय