भंडारा - विवाहित प्रेयसीला भेटायला गेल्यानंतर तिच्या नवऱ्याची अचानक एन्ट्री झाल्याने उडालेल्या गोंधळात अपार्टमेंटच्या बाल्कनीतून थेट रस्त्यावर पडून एक तरुण ठार झाला. ही घटना भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये घडली. त्याच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून भंडारा ठाण्यात तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.महेश वसंतराव डोंगरवार (३६) रा. शिवाजी वार्ड, साकोली असे मृताचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री महेश भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. बेडरूममध्ये हे दोघे असताना प्रेयसीच्या पतीची एन्ट्री झाली. त्याने बेडरुमचे दार वाजविले. तेव्हा महेश हातात कपडे पकडून बाल्कनीत पोहचला व बाल्कनीच्या दाराची कडी बाहेरून लावली. आतून दार वाजविण्याचा आवाज येत असल्याने तो गडबडीत खाली उरण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि थेट सिमेंट रस्त्यावर पडला. त्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. प्रेयसीने भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
बेडरूममध्ये प्रेयसीच्या पतीची एन्ट्री झाली अन् पळ काढणाऱ्या प्रियकराने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 16:35 IST
Extra maritalaffairs : भंडारा येथे अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली पडून तरुणाचा मृत्यू
बेडरूममध्ये प्रेयसीच्या पतीची एन्ट्री झाली अन् पळ काढणाऱ्या प्रियकराने गमावला जीव
ठळक मुद्देमहेश वसंतराव डोंगरवार (३६) रा. शिवाजी वार्ड, साकोली असे मृताचे नाव आहे.