मोटरसायकल रस्त्यावर पार्किंग केल्याच्या रागातून जबर मारहाण
By सदानंद नाईक | Updated: March 12, 2024 20:52 IST2024-03-12T20:51:56+5:302024-03-12T20:52:10+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमी चेतनानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मोटरसायकल रस्त्यावर पार्किंग केल्याच्या रागातून जबर मारहाण
उल्हासनगर : कॅम्प नं-३ पिंटोपार्क हॉटेल समोरील रस्त्यावर मोटरसायकल पार्किंग केल्यावरून वाद निर्माण होऊन मनीष चेतनांनी यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमी चेतनानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील पिंटोपार्क हॉटेल समोरील रस्त्यावर मोटरसायकल पार्किंग केल्याच्या कारणावरून मनीष टिकमदास चेतनानी व कुणाल रॉय यांच्या वडिलांमध्ये वाद निर्माण होऊन त्यांच्यात तू तू मैं मैं झाली. या वादाचा कुणाल रॉय याने मनीष यांना जाब विचारला असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
कुणाल रॉय याने केलेल्या मारहाणीत मनीष चेतनानी यांच्या खांद्याचे हाड सरकून मोडले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कुणाल रॉय याच्यावर गुन्हा दाखल झाला. मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.