शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

खंडणीची धमकी देण्यासाठी ‘तो’ गुजरातहून यायचा वाशीत; झारखंडच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला एटीएसकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 12:32 IST

आराेपीवर ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल, तब्बल ९ वर्षे दिला पाेलिसांना गुंगारा

नवी मुंबई : झारखंड एटीएसला गेली ९ वर्षे गुंगारा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. गुजरातमधून तो केवळ खंडणीसाठी फोन करण्यासाठी वाशीत येत होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. खबऱ्याने टीप दिल्यानंतर झारखंड एटीएस व महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने आठवडाभर सापळा रचून सोमवारी रात्री त्याला अटक केली. टेलिग्राम ॲपद्वारे वाशी रेल्वेस्थानकाचे इंटरनेट वापरून तो फोन करायचा.

अमन सुशील श्रीवास्तव (३१) असे अटक केलेल्या झारखंडच्या गँगस्टरचे नाव आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, आर्म्स ॲक्ट असे ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, २०१५ पासून झारखंडचे दहशतवादविरोधी पथक त्याचा शोध घेत होते. मात्र, राहण्याचे ठिकाण सतत बदलून व फोनचा वापर टाळून तो गुंगारा देत होता. 

ठेकेदारांना टेलिग्रामवरून धमकवायचा अमन -भूमिगत राहूनही अमन सुशील श्रीवास्तव झारखंडमधील खाणमालक व इतर मोठ्या ठेकेदारांना खंडणीसाठी टेलिग्रामवरून धमकवायचा. काही दिवसांपूर्वीच त्याच्या इशाऱ्यावरून टोळीच्या गुंडाने एका व्यावसायिकावर गोळीबारदेखील केला. त्यामुळे झारखंड एटीएसने अमनच्या हस्तकांना अटक केल्यानंतर ते त्याच्याही मागावर होते. महाराष्ट्र एटीएसच्या मार्गदर्शनाखाली रांची एटीएसचे प्रमुख आशुतोष सत्यम व नवी मुंबई एटीएसचे अधिकराव पोळ यांच्या पथकाने सोमवारी त्यास अटक केली.

रेल्वे स्थानकातील मोफत इंटरनेटचा वापर -चौकशीत तो केवळ फोन करण्यासाठी वाशीत आल्याचे समोर आले. झारखंडच्या व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावण्याकिरता तो टेलिग्राम ॲप वापरायचा. वाशी रेल्वेस्थानकाबाहेर येऊनच तिथले इंटरनेट वापरायचा. यादरम्यान स्वतःचा मोबाइल मात्र तो बंदच ठेवायचा. 

रिक्षाने मुंबईला, तिथून रेल्वेने गुजरातला -व्यावसायिकाला धमकावून झाल्यानंतर तो रेल्वेने खारघरला जाऊन तिथून रिक्षाने मुंबईला व तिथून रेल्वेने गुजरातला जायचा. मागील अनेक वर्षांपासून तो रोहन विनोद कुमार या नावाने देशभरात वावरत हाेता. गुजरात व इतर ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्यासाठी, प्रवासाकरिता तो याच नावाचा वापर करत होता. 

बनला वडिलांच्या गँगचा म्होरक्या -२०१५ मध्ये वडील सुशील श्रीवास्तवच्या हत्येनंतर तो वडिलांच्या गँगचा म्होरक्या बनला होता. तेव्हापासून तो भूमिगत राहूनच गँग चालवायचा. गँगच्या सदस्यांनाही तो प्रत्यक्ष भेटत नव्हता. अधिक वेळ तो गुजरात व दिल्लीत राहत होता. व्यावसायिकाला धमकावण्यासाठी फोन करण्यासाठी तो वाशीत आल्यानंतर त्याला पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिसGujaratगुजरात