शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तो वादावर पडदा टाकण्यासाठी निघाला अन् तिने घात केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 23:17 IST

सरप्राईसमुळे तीन  जीव  डावावर : प्रेम कथा नाजूक वळणावर

ठळक मुद्देआरती आणि नसीम या दोघांची आठ वर्षांपूर्वी ओळख झाली. सूत जुळले आणि जाती-धर्माच्या भिंतीला तोडून त्यांनी सात वर्षांपूर्वी निकाह केला.  पत्नी आणि दोन मुले मृत्यूशी झुंजत आहे. त्यामुळे तोही कावराबावरा झाला आहे. सरप्राईजने तीन जीवांना मृत्यूच्या जबड्यात नेऊन ठेवले आहे.

नरेश डोंगरे

नागपूर : खूप दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी तो घरातून बाहेर पडला. घरात रडत कुढत बसलेल्या तिच्या डोक्यात भलतेच होते. त्यामुळे तो घरातून बाहेर पडताच तिने घात केला. तिच्या अविवेकी कृत्यामुळे तीन जिवांच्या वाट्याला जीवन मृत्यूचा संघर्ष आला आहे. मनाचा हिय्या करणारी ही घटना कुण्या चित्रपटातील अर्थात रील नाही, तर रियल स्टोरी आहे.

आरती आणि नसीम या दोघांची आठ वर्षांपूर्वी ओळख झाली. सूत जुळले आणि जाती-धर्माच्या भिंतीला तोडून त्यांनी सात वर्षांपूर्वी निकाह केला. आरती आयेशा बनली. सहा वर्षाचा चिमुकला अन अकरा महिन्याची चिमुकली अशी दोन गोड फुले त्यांच्या प्रेमलतेवर फुलली. गाई म्हशीचे दूध काढून दुधाच्या विक्रीवर या दोघांचा संसार सुरू होता. घरात चणचण होती मात्र गोडवा होता. कोरोनाने त्यांचे आर्थिक आणि कौटुंबिक गणित बिघडवले. दुधाचा धंदा बसला.  मात्र ईकडे तिकडे जाऊन बसण्याची, फिरण्याची सोय नव्हती. त्यामुळे जगणे रटाळ झाले. मनोरंजनाचे कोणतेही घरात साधन नव्हते. त्यामुळे लहान सहान कारणावरून भांड्याला भांडी लागू लागली. १५ दिवसांपासून वादाला तोंड फुटले. जगणे कंटाळवाणे झाले त्यामुळे घरात टीव्ही घेऊन या, असे आयेशा म्हणाली. तर, खायला पैसे नाहीत, टीव्ही कशाने घ्यायचा, असा प्रश्न करून नसीम आयेशासोबत वाद घालू लागला. लहान मुलगा इकडे तिकडे टीव्ही पाहायला जाण्यासाठी बघतो. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या धोक्यामुळे कुणी घरात येऊ देत नाही. त्यामुळे माझ्यासाठी नाही तर मुलांसाठी तरी टीव्ही घ्यायलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आयेशाने घेतली. टीव्हीने मनोरंजन करण्याऐवजी वाद वाढवला. तो टोकाला गेला. दोन-तीन दिवसांपासून आदळआपट सुरू झाली गुरुवारी रात्रीही तसेच झाले. त्यामुळे नसीम शुक्रवारी वेगळा विचार करून घराबाहेर पडला.

वादावर पडदा पडावा, रुसलेली बायको, मुले खूष व्हावी, म्हणून नसीमने दोन गाई विकल्या. त्यातून आलेल्या पैशातून नसीम शुक्रवारी सकाळी टीव्ही घ्यायला निघाला. पत्नीला सरप्राइज देऊन खुश करायचे, असे त्यांनी मनोमन ठरवले होते. मात्र अर्ध्यात जाताच त्याला फोन आला. आयेशाने विष घेतले, मुलांनाही दिले, असे फोन करणाऱ्याने सांगितले. त्यामुळे हादरलेला असीम घरी आला. अत्यवस्थ अवस्थेतील पत्नी, मुलांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घरून निघताना सरप्राईजच्या भानगडीत न पडता सरळ टीव्ही घ्यायला चाललो, असे सांगितले असते तर हे आक्रीत घडले नसते, असा विचार त्याच्या मनातील अपराधीपणाची भावना तीव्र करत आहे. पत्नी आणि दोन मुले मृत्यूशी झुंजत आहे. त्यामुळे तोही कावराबावरा झाला आहे. सरप्राईजने तीन जीवांना मृत्यूच्या जबड्यात नेऊन ठेवले आहे.रडारमुळे झाला गेमघरातील कोंबड्यांना जंतू (पिसवा) झाले होते. ते घालवण्यासाठी नसीमने त्याच्या घरी खूप दिवसांपूर्वी 'रडार -२० ईसी' हे कीटकनाशक आणून ठेवले होते. झाडावरही तो रडारची फवारणी करत होता. आयेशाने याच कीटकनाशकांमुळे पोटच्या दोन मुलांचा आणि स्वतःचा घात करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

Coronavirus News : कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर