शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 17:57 IST

आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून या नर्सचे अनेक महिने लैंगिक शोषण केले होते आणि जेव्हा तिने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तिच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका नर्सवर अ‍ॅसिड आणि लोखंडी पान्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, ज्यात तिचा रविवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणातील आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून या नर्सचे अनेक महिने लैंगिक शोषण केले होते आणि जेव्हा तिने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तिच्यावर हा अमानुष हल्ला करण्यात आला. आरोपीने मृत समजून नर्सला हायवेच्या कडेला फेकून दिले होते.

नेमके काय घडले?पोलिसांच्या तपासानुसार, मृत तरुणी बदायूं जिल्ह्यातील रहिवासी होती आणि अनंत रूप हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. याच हॉस्पिटलचा संचालक असलेल्या डॉ. श्रीपालसोबत तिची ओळख वाढली. सुरुवातीला त्यांचे संबंध सामान्य होते, पण नंतर डॉक्टरने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली. एप्रिल महिन्यात जेव्हा तिच्या कुटुंबाला याबद्दल कळले, तेव्हा तिने नोकरी सोडली.

पत्नीप्रमाणे ठेवून केला अमानुष छळनोकरी सोडल्यानंतरही आरोपीने तिला संजयनगरमधील एका घरात आपल्या पत्नीसारखे ठेवले. काही दिवस सर्वकाही ठीक होते, पण जेव्हा तरुणीला कळले की आरोपी आधीपासूनच विवाहित आहे, तेव्हा तिने घटस्फोट घेऊन लग्न करण्याचा हट्ट धरला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद वाढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीपासून कायमची सुटका करून घेण्यासाठी डॉक्टरने एक भयानक कट रचला. १६ सप्टेंबर रोजी त्याने पोटदुखीचे कारण सांगून तिला आपल्या गाडीत बसवले.

बेशुद्ध करून केला जीवघेणा हल्लागाडीत बसल्यावर डॉक्टरने तिला ढोकळा आणि बर्गर खायला दिले आणि त्यानंतर तिला नशायुक्त इंजेक्शन दिले. ती बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्यावर अ‍ॅसिड आणि लोखंडी पानाच्या मदतीने हल्ला केला. गंभीर जखमी आणि बेशुद्ध असलेल्या नर्सला मृत समजून आरोपीने तिला नग्न अवस्थेत महामार्गाच्या कडेला फेकून दिले. त्याचवेळी पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यावर तिने पोलिसांना जबाब दिला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

आरोपी डॉक्टरला अटकबिथरी चैनपूर पोलिसांनी आरोपी डॉ. श्रीपालला अटक केली आहे. अटक होताना त्याने हृदयविकाराचा झटका आल्याचे नाटक करून रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याची चलाखी ओळखली. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अ‍ॅसिड, कपडे, बूट, पाना आणि ग्लोव्हज जप्त केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश