स्वत: साखरपुड्यात बनली पोलिस अन् थेट जेलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:32 IST2024-03-27T11:31:42+5:302024-03-27T11:32:39+5:30
आरोपी महिलेचे नाव जदाला मालविका असे आहे.

स्वत: साखरपुड्यात बनली पोलिस अन् थेट जेलमध्ये
आई-वडील आणि नातेवाइकांना खूश करण्यासाठी रेल्वेत बनावट पोलिस उपनिरीक्षक बनून फिरणाऱ्या २५ वर्षीय महिलेला तेलंगणा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तिने अनेक ठिकाणी फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आरोपी महिलेचे नाव जदाला मालविका असे आहे. महिलेने आपली बनावट ओळख सांगून तेलुगू चित्रपट अभिनेत्यांसोबत ओळख वाढविली. त्याचा अनेकदा तिने फायदाही घेतला.
ती प्रवशांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून ओळख करून देत असे. यातून अनेकांना गंडा घातल्यानंतर तिच्याविरुद्ध तक्रारी वाढल्या होत्या, मालविका आपल्या साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आल्यानंतर तिच्या होणाऱ्या पतीमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.