शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सराफ दुकानात दरोडा टाकून मिळवली सुरक्षा रक्षकाची नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:26 IST

Crime News : यावलच्या गुन्ह्याचा उलगडा : नवी मुंबईतून एकाला अटक

ठळक मुद्देदरोडा टाकल्यानंतर चारही जण वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले. त्यातील निवृत्ती याने नवी मुंबईत एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवली होती.

सुनील पाटील

जळगाव : यावल येथे सराफ दुकानात भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून ११ लाख २६ हजार ६७५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या प‌थकाने पर्दाफाश केला असून निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय ३१,रा.कांदीवली, मुळ रा. रामनगर कन्नड, जि.औरंगाबाद) याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली. दरोडा टाकल्यानंतर चारही जण वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले. त्यातील निवृत्ती याने नवी मुंबईत एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवली होती.

यावल येथे ७ जुलै रोजी काळ्या रंगाच्या दुचाकीने आलेल्या चौघांनी पिस्तूलचा धाक दाखवून काचेचा कांउटर फोडले होते व १ लाख २६ हजार ६७५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी जगदीश रत्नाकर कवडीवाले यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी लागलीच घटनास्थळ गाठून तेथेच चौकशी पथक तयार केले होते. या चौघातील एक जण थेट नवी मुंबईत दाखल झाला व तो तेथे सुरक्षा रक्षकाचे काम करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार बकाले यांनी क्षणाचाही विलंब न लावता सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, शरद भालेराव, राजू मेढे, रामकृष्ण पाटील, अशोक पाटील व किरण चौधरी यांचे पथक रवाना केले. या पथकाने मंगळवारी रात्रीपासून तेथे सापळा लावला. निवृत्ती जसा ड्युटीवर आला तसा त्याला पथकाने हेरले.

दागिने दुसऱ्या संशयिताकडेनिवृत्ती याने गुन्ह्याची कबुली दिली असून दागिने मुकेश प्रकाश भालेराव (रा.भुसावळ) याच्याकडे असून हा गुन्हा करताना रुपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी, मुकेश भालेराव, सुनील अमरसिंग बारेला व चंद्रकांत उर्फ विक्की लोणारी (सर्व रा.भुसावळ) आदी जण सोबत असल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर सर्व जण वेगवेगळ्या दिशेने गेले. निवृत्ती हा देखील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी प्राणघातक हल्ला व शस्त्र आदी प्रकारचे गुन्हे त्याच्याविरुध्द दाखल आहेत.  त्याला बुधवारी रात्री यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कारागृहातून मिळाले गुन्हेगारीचे धडेनिवृत्ती हा रोजगारानिमित्त जळगावात आला. एमआयडीसीतील हॉटेलमध्ये वेटर होता. २०१५ मध्ये कालिंका माता चौकात एका जणावर त्याने प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हा त्या गुन्ह्यात कारागृहात गेला होता. तेथे त्याची भुसावळातील सराईत गुन्हेगार मुकेश भालेराव याच्याशी ओळख झाली. तेथून दोघांमध्ये मैत्री झाली व नंतर गुन्हेगारीचे धडे गिरवायला सुरुवात केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDacoityदरोडाPoliceपोलिसJalgaonजळगावNavi Mumbaiनवी मुंबई