शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झोपलेल्या पती-पत्नीवर घरात घुसून धारदार चाकूने केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 21:40 IST

Crime News : पूर्वेकडील बावशेतपाडा येथील चौबे चाळीत अमित मिश्रा (24) आणि त्याची पत्नी ज्योती मिश्रा हे दोघे राहतात. शुक्रवारी रात्री दोघेही घरी झोपलेले असताना माथेफिरू आरोपीने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने घरात प्रवेश केला.

नालासोपारा - संतोष भवनच्या बावशेत पाडामधील एका चाळीतील घरात शुक्रवारी रात्रीच्या वेळी झोपलेल्या पती व पत्नीवर माथेफिरू हल्लेखोराने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात व घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना उपचारासाठी स्थानिक लोकांनी विजय नगरच्या मनपाच्या रुग्णालयात नेले. पण दोघांची नाजूक स्थिती पाहता डॉक्टरांनी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात नेण्यास सांगितले. दोघेही जखमींना अतिदक्षता विभागात भर्ती करून उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत आरोपी माथेफिरूवर दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत तपास करत आहे.पूर्वेकडील बावशेतपाडा येथील चौबे चाळीत अमित मिश्रा (24) आणि त्याची पत्नी ज्योती मिश्रा हे दोघे राहतात. शुक्रवारी रात्री दोघेही घरी झोपलेले असताना माथेफिरू आरोपीने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्याच्याकडील धारदार चाकूने पत्नी ज्योतीच्या गळ्यावर, मानेवर आणि दंडावर तसेच अमितच्याही दंडावर सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला. जखमी अमितने आरोपीला विरोध केला त्यामुळे आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे नागरिक उठले. आरोपी एक चाकू घरातच टाकून तेथून पळून गेला आहे. घरात व घराच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यातील अमित व पत्नी ज्योतीला स्थानिकांनी उपचारासाठी मनपाच्या हॉस्पिटलमध्ये नेले. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. सदर आरोपी हा शुक्रवारी सकाळी त्या परिसरात दिसल्याचे व अमितच्या मोबाईलवर आरोपीने जीवे ठार मारण्याचा संदेश पाठवला असल्याचे स्थानिकांनी लोकमतला सांगितले. नेमका हा आरोपी कोण आहे ? त्याने हा हल्ला का केला याचा पोलीस तपास करत आरोपीचा शोध घेत आहे.

 

शुक्रवारी रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्या पतिपत्नीवर एका आरोपीने चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दोघेही जखमी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेत आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलVasai Virarवसई विरार