बारामती - बारामतीत भर दिवसा दुपारी तीन वाजता घरात घुसून लूट केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बारामती शहरातील भालेराव गॅरेज च्या मालकाच्या पत्नी आणि सुनेच्या गळ्याला चाकू लावून साडे सहा लाखांची रोकड आणि दिड लाखाचे दागिनेसह आठ लाखांचा मुद्देमाल पळवून नेण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. फलटण रस्त्यावरील भालेराव गॅरेज चे मालक भाऊसाहेब नामदेव भालेराव यांच्या राहत्या घरामध्ये दोन अज्ञात इसम घुसले. या दोघांनी घरात घुसून भाऊसाहेब नामदेव भालेराव यांच्या पत्नी प्रमिला तसेच सून काजल आशितोष भालेराव यांच्या गळ्याला चाकू लावला. तसेच 8 लाख रुपये चा मुद्देमाल पळवून नेला आहे.या अज्ञात इसमाच्या अंगा मध्ये पिवळ्या कलरचा शर्ट आणि आणि काळी पॅन्ट आणि दुसऱ्या इसमाच्या अंगात निळा शर्ट व स्किन कलरची पॅन्ट आहे. या वर्णनाचे इसम दिसल्यास बारामती शहर पोलीस ठाण्याशी .02112 224333 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केले आहे.
घरात घुसून गळ्याला चाकू लावत रोख रकमेसह आठ लाखांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 21:29 IST