शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape : सीबीआयला रिकाम्या हाती लागले परतावे, सीसीटीव्हीचे बॅकअप नाही मिळाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 21:42 IST

Hathras Gangrape : सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बॅकअप मिळू न शकल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

ठळक मुद्देएका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हाथरस घटनेच्या पहिल्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे ठरू शकले असते.

हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा तपास आता सीबीआय करत आहे. घटनेनंतर पीडितेला सुरुवातीला ज्या जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते, रुग्णालयात सीबीआयचे पथक चौकशीसाठी पोहोचले होते. सीबीआयने तेथून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बॅकअप मिळू न शकल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.पोलिसांनी त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज घेतले नव्हते. आता एका महिन्यानंतर सीसीटीव्ही फुटेज बॅकअप नाही. प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेज ठेवण्यासाठी सांगितले असते, तर ते जतन करता आले असते. दर सात दिवसांनी मागील फुटेज डिलिट होतात,' असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. इंद्रवीर सिंह यांनी म्हटले आहे. डॉक्टरांचे जबाब नोंदवण्यासाठी आणि पुरावे तपासण्यासाठी सीबीआयचे पथक जिल्हा रुग्णालयात पोहोचले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हाथरस घटनेच्या पहिल्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे ठरू शकले असते. पीडितेला कोणत्या वेळेला रुग्णालयात आणण्यात आले याची माहिती मिळू शकली असती. तिला कधी बाहेर नेण्यात आले. पीडितेला कोण भेटायला आले होते? रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्याशी कुणी चर्चा केली, तिच्यावर काय आणि कसे उपचार करण्यात आले, याबाबत माहिती मिळण्यास मदत झाली असती, असे सूत्रांनी सांगितले.रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज का मागितले नाहीत असा प्रश्न जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना विचारला असता गेला, त्यावेळी जोपर्यंत रुग्णालयात गुन्हा घडत नाही अथवा निष्काळजीपणा झाला नसेल तर सीसीटीव्हीची चौकशी होत नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणाचा तपास ठरावीक मुदतीत केंद्रीय अन्वेषण खाते (सीबीआय) करील, असे राज्य सरकारने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालय सीबीआयला दर १५ दिवसांनी तपासाचा अहवाल राज्य सरकारला द्यावा, असा आदेश देऊ शकेल. तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात राज्याचे पोलीस महासंचालक सादर करतील. हाथरस प्रकरणावर राजकीय हेतूंनी खोट्या व बनावट गोष्टी पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तपास सीबीआयकडून केला जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. नंतर तो तपास सीबीआयकडे सोपवला गेला व तो सुरूही झाला.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलCBIगुन्हा अन्वेषण विभाग