Hathras Gangrape : Be careful! Fake photo of Hathras rape victim goes viral on social media | Hathras Gangrape : सावधान! बलात्कार पीडितेचा बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Hathras Gangrape : सावधान! बलात्कार पीडितेचा बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ठळक मुद्देइंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रूममध्ये (एएफडब्ल्यूए) असे आढळले की, ज्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या नावावर शेअर केला जात आहे, तो खरतर दुसऱ्या मुलीचा फोटो आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेतील पीडित मुलीचा आज सकाळी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. 14 सप्टेंबर रोजी या 19 वर्षीय मुलीवर शेतात चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितेला न्याय देण्यासाठी अनेक हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. दरम्यान, उसाच्या शेतात हसत हसत मुलीचा फोटो अनेक लोक शेअर करत आहेत. असा दावा केला जात आहे की, ही मुलगी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित आहे.


इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रूममध्ये (एएफडब्ल्यूए) असे आढळले की, ज्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या नावावर शेअर केला जात आहे, तो खरतर दुसऱ्या मुलीचा फोटो आहे. हा दावा ट्विटरवर खूप व्हायरल झाला आहे. सामूहिक बलात्कार पीडित नावाच्या हॅशटॅगसह हा फोटो शेअर केला आहे. त्यात लिहिले की, "या निरागस, सुंदर  मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला या विचाराने माझे हृदय कंपित झाले. गँगरेप झाला, जीभ कापली गेली, मान आणि पाठीचा कणा तोडला गेला ... इतका अत्याचार कोणालाही सहन करावा लागत नाही! तथापि, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. बदल येणं आवश्यक आहे. आता ही बातमी लिहिली गेल्यानंतर जवळपास १९०० लोकांनी ही पोस्ट शेअर केली होती. पोस्टचा फोटो आपण खाली पाहू शकता.तसेच, दुसर्‍या युझर अनु तोमरनेही व्हायरल फोटो शेअर करत लिहिले आहे की, “निर्भयाप्रमाणे उत्तरप्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्याची जीभ कापली गेली, पाठीचा कणा आणि मानेला दुखापत केली. " ही पोस्ट  लिहिली गेल्यानंतर जवळपास १८०० लोकांनी ही पोस्ट शेअर केली होती.

'जनभारत टाईम्स', 'तेलगू सर्कल्स', 'भारतहेडलाईन्स' आणि 'पब्लिकलिस्ट रेकॉर्डर' सारख्या बर्‍याच वेबसाइट्सनेही हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे फोटो म्हणून आपल्या बातमीत व्हायरल प्रतिमेचा उपयोग केला आहे. या वेबसाइटमध्ये प्रकाशित केलेल्या बातमीत वापरलेला फोटो आपण खाली पाहू शकता.दाव्याची उलटतपासणी 

हाथरस येथे राहणा-या सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाला व्हायरल चित्र पाठविले. हा फोटो पाहून पीडितेच्या भावाने सांगितले की, ती त्याची बहीण नाही. उसाच्या शेतात उभी असलेली व्हायरल फोटोत दिसणारी मुलगी आणखी कोणी आहे याची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांनीही केली.

आज तकच्या हाथरसचे संवाददाता राजेश सिंघल यांनी पीडितेच्या मुलाखतीचा व्हिडिओ पाठवला. त्याने मुलीची काही छायाचित्रेही पाठविली, जी घटनेच्या आधी आणि नंतरची आहेत. आम्ही ती छायाचित्रे आणि व्हिडिओंची तुलना व्हायरल फोटोंशी केली आणि आम्हाला आढळले की, व्हिडीओ आणि छायाचित्रात दिसणार्‍या मुली वेगवेगळ्या आहेत. हे फोटो खाली पाहू शकता. मुलीची ओळख पटू येत म्हणून आम्ही चेहरा अस्पष्ट केला असल्याची माहित आज तकने दिली आहे.


 

Web Title: Hathras Gangrape : Be careful! Fake photo of Hathras rape victim goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.