शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape : अक्षय कुमारची संतप्त प्रतिक्रिया, ही क्रूरता कधी थांबणार! बलात्काऱ्यांना फाशी द्या  

By पूनम अपराज | Updated: September 29, 2020 19:37 IST

Hathras Gangrape : जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या, असे म्हणत अक्षय कुमारने आपला रोष व्यक्त केला आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका 19 वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्कारची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या, असे म्हणत अक्षय कुमारने आपला रोष व्यक्त केला आहे.या घटनेवर दुःख व्यक्त करताना अक्षय कुमारने ट्वीटद्वारे आपला राग व्यक्त केला आहे. ‘संताप आणि मनःस्ताप. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण, कितीही क्रूरता. कधी थांबणार आहे हे सगळे? आपल्या कायद्याने आता अधिक कडक व्हायला पाहिजे की शिक्षा ऐकताच गुन्हेगार भीतीने थरथर कापला पाहिजे. गुन्हेगारांना फाशी द्या. महिलांच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी आवाज उठवूया, इतके आपण सगळेच करू शकतो’, अशा कडक शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

 

उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात घडली घटनाउहाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरूणीवर गावातीलच 4 नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. यापूर्वी हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रम वीर यांनी सांगितले होते की 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारPoliceपोलिसAkshay Kumarअक्षय कुमारUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकTwitterट्विटर