शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:06 IST

तक्रारीत लग्नाआधी कार आणि बाइक घेणे व एका दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करण्याचा आरोपही तरूणीने लावला आहे. दुसऱ्या तरूणीसोबत तरूणाचं १८ जुलैला लग्न होणार होतं.

हरयाणाच्या (Haryana) रेवाडी जिल्ह्यात लग्नाच्या एक दिवसाआधी नवरदेव रेपमध्ये (Rape Case) पकडलं गेला. त्याच्या विरोधात एक तरूणीने रेपचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने तरूणावर साखरपुड्यानंतर हॉटेलमध्ये बोलवून रेप केल्याचा आरोप लावत महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.  

तक्रारीत लग्नाआधी कार आणि बाइक घेणे व एका दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करण्याचा आरोपही तरूणीने लावला आहे. दुसऱ्या तरूणीसोबत तरूणाचं १८ जुलैला लग्न होणार होतं. महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पीडित तरूणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील बावल रोडवरील एका हॉटेलमध्ये १५ एप्रिल २०१९ ला तरूणीचा साखरपुडा एका तरूणासोबत झाला होता. साखरपुड्यावेळी सांगण्यात आलं होतं की, तरूण एका खाजगी बॅंकेत कार्यरत आहे. पण नंतर समजलं होतं की, तो त्या बॅंकेत नोकरी करत नाही.  १० नोव्हेंबर २०१९ ला तरूणाने तरूणीला लग्नाचं प्लॅनिंग करण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये बोलवलं होतं. आरोपीने लग्न करण्याचा विश्वास देऊन तिच्यासोबत हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते.

कार घेण्यासाठी दोन लाखही दिले

तरूणीने आरोप लावला की, तरूणाला एक बाइकही घेऊन दिली होती. ७ डिसेंबर २०२० ला तरूणाने बलेनो कार खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून दोन लाख रूपयेही घेतले होते. पण जेव्हाही तरूणी लग्नाचा विषय काढत होती तेव्हा तेव्हा तरूण टाळाटाळ करत होता. आता तिला समजलं की, तरूण १८ जुलैला दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करणार  आहे.

दुसऱ्या तरूणीसोबत लग्न

पीडितेने सांगितलं की, तिला १६ जुलैला समजलं होतं की, तरूण १८ जुलैला शहरातीलच एका दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार आहे. तिने तरूणासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला होता. पण तो तिच्यासोबत बोलला नाही. पीडितेने शुक्रवारी महिला पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दिली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :HaryanaहरयाणाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी