शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी गाडीनं उडवलं, नंतर जखमी अवस्थेत रुग्णालयाच्या गेटवर सोडून काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 20:58 IST

पोलिसांच्या पीसीआर व्हॅनने एका जोडप्याला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पलवल: हरियाणाच्या पलवलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कॅम्प पोलिस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 19 वर असलेल्या हुडा उड्डाणपुलावर एका जोडप्याला पोलिस पीसीआर वाहनाने धडक दिली. या अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर पोलिसांचा अमानवी चेहराही समोर आला आहे. पोलिस पती-पत्नीला जखमी अवस्थेत हॉस्पिटलच्या गेटवर सोडून पळून गेल्याचा आरोप आहे. जखमी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या घटनेबाबत तपास अधिकाऱ्याने सांगितले की, मिंडकौला गावात राहणाऱ्या प्रेम नावाच्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने सांगितले की, 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ती पती रणजीतसोबत बल्लभगड येथून बाईकवरून घराकडे जात होती. वाटेत हुडा चौकातील उड्डाणपुलावर पोलिसांच्या भरधाव पीसीआर वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. पीसीआर वाहन वेगात असून चालक निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे पोलिसांवर गंभीर आरोप या धडकेमुळे पती-पत्नी दोघेही रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले, असे पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पोलिसांच्या गाडीने त्या दोघांना शासकीय रुग्णालयात आणले, पण तेथे दोघांना गेटवर सोडून वाहन चालकाने पळ काढला. उपचारादरम्यान, पती रणजीतचा मृत्यू झाल्याचे तिला नंतर समजले. या अपघातात महिलेलाही गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून  तपास सुरू केला आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू