शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा; तीन नव्या कायद्यांवरील चर्चेत गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 05:38 IST

गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांऐवजी तीन नव्या कायद्यांची जागा घेणारे विधेयक सादर करताना ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हिट अँड रन प्रकरणात आता ज्याने धडक दिली, त्या वाहनचालकाने अपघातग्रस्ताला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यास, त्याच्या शिक्षेत कपात करण्यात येणार आहे. पण धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा देण्यात येईल, असे लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांऐवजी तीन नव्या कायद्यांची जागा घेणारे विधेयक सादर करताना ते बोलत होते.

नव्या विधेयकांमधील महत्त्वाचे मुद्दे...

nसंघटित गुन्हेगारीची व्याख्या : संघटित गुन्हेगारीमध्ये सायबर गुन्हे, लोकांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांचा समावेश केल्याने पोलिस आणि न्यायव्यवस्थेला तपास करण्यास सोपे जाणार आहे.nनवीन कलमे : नव्याने आणण्यात आलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ४८४ ऐवजी ५३३ कलमे आहेत. नऊ कलमे वाढविण्यात आली, तर १७७ कलमांमध्ये बदल करण्यात आला. ३९ उपकलमांचा समावेश केला असून ४४ नव्या तरतुदी आहेत.nबलात्कार प्रकरण : यापुढे बलात्कार प्रकरणात न्यायवैद्यक शाळेच्या अहवालाला प्रमुख स्थान असणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास केला जाईल.nपीडितांना म्हणणे मांडण्याचा अधिकार : भारतीय न्यायसंहितेने सुनावणीदरम्यान पीडितांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला आहे. तसेच शून्य एफआयआर पीडिताची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मागे घेता येणार नाही.nजामीन मिळणार : सुनावणी सुरू असतानाच आरोपीने जर एक तृतीयांश काळ तुरुंगात काढला असेल तर तो किंवा ती जामीन मिळण्यास पात्र ठरणार.nराजद्रोहाचा कायदा रद्द : ब्रिटिशकाळात आणला गेलेला राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात डांबण्यासाठी हे कलम ब्रिटिशांनी वापरले होते. त्याऐवजी आता देशद्रोहाचे कलम समाविष्ट केले आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहAccidentअपघातlok sabhaलोकसभा