शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देत कारागृह परिसरातून पसार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:05 IST

आरोपी साईमन याला अजनी पोलिसांनी २७ ऑगस्टला दुचाकी चोरीच्या आरोपात अटक केली. होती. २८ ऑगस्टला न्यायालयात हजर करून त्याचा पोलिस कस्टडी रिमांड मिळवला. रिमांड संपल्यामुळे त्याला पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले.

नागपूर - अनेक गुन्ह्यात सहभागी असलेला अट्टल गुन्हेगार साईमन फ्रॉन्सिस अँथोनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. रविवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास कारागृह परिसरात ही घटना घडली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपी साईमन याला अजनी पोलिसांनी २७ ऑगस्टला दुचाकी चोरीच्या आरोपात अटक केली. होती.२८ ऑगस्टला न्यायालयात हजर करून त्याचा पोलिस कस्टडी रिमांड मिळवला. रिमांड संपल्यामुळे त्याला पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिल्यामुळे अजणीचे पोलीस आरोपी साईमनला घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या समोर निर्माण करण्यात आलेल्या मंगलमूर्ती लॉनमधील तात्पुरत्या कारागृहात पोहोचले. तेथे त्याला कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस गाफील असल्याची संधी साधून साईमनने धूम ठोकली. तो पळत असल्याचे पाहून अजनी पोलीस तसेच कारागृह पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र नगरसेवक लक्ष्‍मी यादव यांच्या घराच्या गल्लीतून अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेला. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली.संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी अजनीचे ठाणेदार प्रदीप रायनावार तसेच नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यामुळे या भागातील गस्तीवरील पोलिस पथके शोधाशोध करू लागले. रात्री १० वाजेपर्यंत तो हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांचा शोध घेतला जात आहे.  पोलिसांना कारवाईचा धाक या घटनेमुळे पोलिसंवर मोठे दडपण आले आहे. जे पोलीस साईमनला घेऊन कारागृहात पोचले होते. त्यांना स्वतःवरील कारवाईचा धाक वाटत आहे. आरोपी लवकर सापडला नाही तर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर