शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

'हर हर शंभू' फेम गायिकेचे वडील अन् भाऊ निघाले खूनी, हत्येच्या आरोपाखाली झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 19:14 IST

गायिका फरमानी नाझ इंडियन आयडॉल हा शो मध्येही येऊन गेली आहे

Har Har Shambhu fame Farmani Naaz: तुम्हाला गायिका फरमानी नाझ आठवत असेलच. तिचे 'हर हर शंभू' हे शिवभजन खूप गाजले. 'इंडियन आयडॉल'मध्येही तिने नशीब आजमावले, पण मुलाच्या ऑपरेशनमुळे तिला शो मध्येच सोडावा लागला. आता एका वेगळ्या कारणाने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुझफ्फरनगर पोलिसांनी गायिकेच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिचा भाऊ आणि वडिलांसह अन्य 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांना आरोपी म्हणून घोषित केले आहे. याशिवाय हत्येदरम्यान वापरलेले दोन चाकू आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 5 ऑगस्ट रोजी घडली. फरमानी नाजचा चुलत भाऊ खुर्शीद याच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हल्ला केला आणि त्याला जखमी करून ते पळून गेले. घरच्यांना कळताच त्यांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आता या घटनेमागे फरमानीचाच भाऊ आणि वडील असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

फरमानीचा भाऊ आणि वडिलांना अटक

या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी अनेक पथकेही तयार केली होती. आता वडील आरिफ, भाऊ फरमान यांच्याशिवाय फरियाद आणि झाकीर नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेली शस्त्रे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकIndian Idolइंडियन आयडॉल