शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वरळीत खळबळ! नोकरी घालवल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला हातोडा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 21:30 IST

Murder : ५० वर्षीय व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरातील एका कन्स्ट्रक्शन साइटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होती. शनिवारी ही व्यक्ती कामावर असताना त्याच्या पूर्व सहकाऱ्यांने त्याच्या डोक्यात हातोडा घातला.

ठळक मुद्दे मृत व्यक्तीने आरोपी व्यक्तीची नोकरी घालवली होती. याचा राग मनात ठेवून त्याने आपल्या दोन अन्य साथीदारांच्या मदतीने संबंधित सिक्युरिटी गार्डच्या हत्येचा कट रचला.

वरळी परिसरात हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका ५० वर्षांच्या व्यक्तीची डोक्यात हातोड्याने अनेक वार करत हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्ती एका कन्स्ट्रक्शन साइटवर एक सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होती. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असून पोलिसांनी आरोपी असलेल्या पूर्व सहकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

५० वर्षीय व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरातील एका कन्स्ट्रक्शन साइटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होती. शनिवारी ही व्यक्ती कामावर असताना त्याच्या पूर्व सहकाऱ्यांने त्याच्या डोक्यात हातोडा घातला. पीडित व्यक्तीला काही कळायच्या आत आरोपीने त्याच्या डोक्यावर हातोड्याने जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वरळी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने आपला गुन्हा कबुल केला असून त्याच्यावर पुढील कारवाई केली जात आहे. मात्र या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. 

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू

 

मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी व्यक्ती आणि मृत व्यक्ती यांच्यात काही कारणांमुळे वाद झाला होता. त्यानंतर मृत व्यक्तीने आरोपी व्यक्तीची नोकरी घालवली होती. याचा राग मनात ठेवून त्याने आपल्या दोन अन्य साथीदारांच्या मदतीने संबंधित सिक्युरिटी गार्डच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर शनिवारी मारेकऱ्यांनी कन्स्ट्रक्शन साइटवर जावून संबंधित सिक्युरिटी गार्डवर हल्ला केला. आरोपींनी सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ही व्यक्ती नीचपत खाली पडली,नंतर त्याच्या डोक्यात हातोड्याने अनेक वार करण्यात आले. ज्यामध्ये सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू झाला आहे.

टॅग्स :MurderखूनMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटक