Half-burnt body found next to a drain; Excitement in Majalgaon | नाल्याच्या शेजारी आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; माजलगावात खळबळ
नाल्याच्या शेजारी आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; माजलगावात खळबळ

ठळक मुद्देशरीर रचनेनुसार १५ किंवा १६ वर्षीय व्यक्तीचे प्रेत

माजलगाव : शहरातील अशोक नगर भागात नाल्याच्या कडेला सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अर्धवट जळालेला मृतदेह आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. 

अशोक नगर येथील खालील भागात असलेल्या नाल्याच्या कडेला आज सकाळी ११ वाजेच्या काही मुले खेळत होती. यावेळी त्यांना झुडपात अर्धवट जळालेला मृतदेह दिसला असता त्यांनी याची माहिती शेजारील घर मालकास दिली. घर मालकाने तत्काळ पोलिसांना याची माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. प्रेत अर्धवट जळालेले असून शरीर रचनेनुसार १५ किंवा १६ वर्षीय व्यक्तीचे प्रेत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाल्याच्या कडेला कचरा असल्याने येथे जास्त वर्दळ नसते. तसेच या भागात वस्ती विरळ असल्याने प्रेत जळाल्याचे लागलीच लक्षात आले नाही.

Web Title: Half-burnt body found next to a drain; Excitement in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.