घणसोलीतून १० लाखाचा गुटखा जप्त; राहत्या घरातच केला होता साठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 20:12 IST2022-09-19T20:12:25+5:302022-09-19T20:12:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : घणसोली येथून विक्रीसाठी साठवलेला दहा लाख ६० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त ...

Gutkha worth 10 lakh seized from Ghansoli; The stock was made in the living house | घणसोलीतून १० लाखाचा गुटखा जप्त; राहत्या घरातच केला होता साठा 

घणसोलीतून १० लाखाचा गुटखा जप्त; राहत्या घरातच केला होता साठा 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : घणसोली येथून विक्रीसाठी साठवलेला दहा लाख ६० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

घणसोली परिसरात अवैधरित्या गुटखा साठवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंडगे यांना मिळाली होती. त्याद्वारे अवैध मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक करण्यात आली होते. त्यांनी शुक्रवारी घणसोली सेक्टर १ येथील एका फ्लॅटवर छापा टाकला. यामध्ये त्याठिकाणी १० लाख ६० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. हा गुटखा नमीद अहमद शकील अहमद व मोहम्मद तारिक अस्लम खान यांनी विक्रीसाठी साठवला होता. त्यानुसार या दोघांवर कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नमीद याला अटक करण्यात आली आहे. तर मोहम्मद याचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरु केली असून त्या अंतर्गत हि कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Gutkha worth 10 lakh seized from Ghansoli; The stock was made in the living house