Video : बंदुकीच्या धाकावर पळविला होता मुद्देमाल; कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेने केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:28 IST2018-12-21T16:08:26+5:302018-12-21T16:28:18+5:30
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

Video : बंदुकीच्या धाकावर पळविला होता मुद्देमाल; कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेने केली अटक
वर्धा - तडीपारीची कारवाई झालेल्या तसेच हत्या, मारहाणसह बंदुकीच्या धाकावर रोकड पळविणे, दारूविक्री आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
या दोन्ही आरोपींनी संगणमत करून येथील सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या जुन्या मार्गावर दुचाकीने जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांच्याजवळील रोख, मोबाईल व सोन्याची अंगठी बंदुकीच्या धाकावर पळवून नेली होती.या गुन्ह्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीसह एक बंदुक व दोन गोळ्या तसेच दोन मोबाईल जप्त केले आहे. या दोन्ही आरोपींना गोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केळापूर शिवारातून ताब्यात घेत अटक केली.