शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

भर पावसात पवना धरणाच्या डोंगरातून गुंडाला पकडले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 21:46 IST

कोथरुडमध्ये तलवारीने माजविली होती दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या बॅनरवर फोटो न लावल्याने तलवारीने राडा घालून दहशत निर्माण करणारा गुंड व त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने पवना धरणामागील तुंगी गावाच्या डोंगरावर पकडले. कोणतेही वाहन जात नसल्याने मुख्य रस्त्यापासून दूर डोंगरात पावसा पाण्यात चिखल, ओढे ओलांडून हे पथक डोंगरावर पोहचले. तेथे लपवून बसलेल्या या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

ओंकार ऊर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरुड) आणि अशोक बाळकृष्ण कळजकर (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या बॅनरवर फोटो लावला नाही, म्हणून ओंकार कुडले याने तलवार घेऊन हवेत फिरवून व दगड स्टेजवर फेकले. तलवारीने साऊंड सिस्टीम ऑपरेटरवर वार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने शास्त्रीनगरमध्ये एकच तणाव निर्माण झाला होता. स्वत: पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी मध्यरात्री कोथरुड पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. पोलिसांनी तो पवना धरणाजवळील डोंगराळ भागात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर हे सहकार्यांसह रवाना झाले. या पथकाने डोंगर दर्यां, ओढे पार करत डोंगरावर जाऊन या दोघांना पकडले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, हवालदार शितल शिंदे, संजय आढारी, किरण ठवरे, पोलिस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अशोक शेलार, अमोल वाडकर, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, शंकर संपते, पोलिस मित्र सुधीर सोनवणे, राजेंद्र मारणे, सचिन आहिवळे, धनंजय ताजने यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक