शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

रॅगिंग केव्हा थांबणार? प्रायव्हेट पार्टमध्ये टूथब्रश, सॅनिटायझर टाकले; व्हिडिओ रेकॉर्ड करुन शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 18:17 IST

गुजरातमधील राजकोटमध्ये रॅगिंगचं एक धक्कादायक एक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका खासगी विद्यापीठात पाच विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा अंघोळ करताना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले.

गुजरातमधील राजकोटमध्ये रॅगिंगचं एक धक्कादायक एक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका खासगी विद्यापीठात पाच विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा अंघोळ करताना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले. पीडिताच्या म्हणण्यानुसार, या विद्यार्थ्यांनी ताच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. एवढेच नाही तर त्यांने क्रूरतेची हद्दच ओलांडली आणि ज्युनिअरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर, मध, टूथब्रश आणि पेन्सिलही टाकली. तसेच प्रायव्हेट पार्ट कापून टाकण्याची धमकी दिली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच आरोपी विद्यार्थ्यांपैकी एक अल्पवयीन आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच पीडित विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पीडिताच्या वडिलांनी राजकोटमधील कुवाडवा रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पीडित मुलाने आपल्या मोठ्या बहिणीला हॉस्टेलमध्ये न राहण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यादरम्यान तो फोनवर ढसाढसा रडत होता. यावर बहिणीने तत्काळ वडिलांना फोन करून ही माहिती दिली. यानंतर बहीण आणि वडील ताबडतोब त्याची भेट घेण्यासाठी हॉस्टेलमध्ये भेटायला गेले होते.

कुटुंबीयांना पाहून तो खूप रडलापीडित विद्यार्थ्याला आपल्या कुटुंबीयांना पाहून रडूच कोसळले आणि त्याने आपली व्यथा मांडली. जी ऐकून कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. पीडिताने सांगितलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात तो आंघोळ करत असताना तीन विद्यार्थ्यांनी त्याचा न्यूड व्हिडिओ बनवला होता. यानंतर त्यांनी त्यांचे म्हणणे न ऐकल्यास त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिली होती. 

प्रायव्हेट पार्ट कापण्याची धमकीआरोपींनी पीडिताला तीन पर्याय दिले होते. पहिला म्हणजे एक तर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकावा, दुसरा कान कापावा किंवा तिसरा पर्याय म्हणून त्याने वसतिगृहाच्या छतावरून उडी मारावी. हे ऐकून विद्यार्थी घाबरला तेव्हा आरोपींनी त्याला आणखी एक पर्याय दिला. तो म्हणजे त्यांना जे मनाला वाटेल ते करु द्यावं. 

विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंधपीडित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर, मध आणि पावडर देखील लावली. नराधम इथंच थांबले नाहीत तर त्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल आणि टूथब्रशही टाकला. तासनतास आरोपी विद्यार्थ्यांनी त्याचा छळ केला. सध्या या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच आरोपींपैकी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर पीडित विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात