शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 12:30 IST

एका कॉन्स्टेबलवर पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी लाच मागितल्याचा आरोप असून त्याला एसीबीने रंगेहाथ पकडलं.

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २०१४ च्या लाच प्रकरणातन्यायालयाने आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला दोषी ठरवून ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मोरबी जिल्ह्यातील मालिया पोलीस ठाण्याच्या एका कॉन्स्टेबलवर पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी लाच मागितल्याचा आरोप असून त्याला एसीबीने रंगेहाथ पकडलं. याच प्रकरणात स्थानिक न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये तक्रारदार मनोजची वहिनी पूजा हिला तिच्या पतीला भेटण्यासाठी नैरोबीला जायचं होतं. ज्यासाठी पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेदरम्यान पोलिस व्हेरिफिकेशनदेखील होतं, त्यासाठी १७ मार्च २०१४ रोजी पूजाला मालिया पोलीस स्टेशनमधून फोन आला. पूजा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.

कॉन्स्टेबल अमरतभाई यांनी सही घेतली आणि नंतर ५०० रुपये भरण्यास सांगितले. पूजाने विचारले की, सर्व फी आधीच भरली आहे तर आता पैसे का द्यायचे? दुसऱ्या दिवशी कॉन्स्टेबल अमरत मकवाना यांनी फोन करून तुम्हाला पासपोर्ट हवा असेल तर ५०० रुपये द्यावे लागतील, अन्यथा पासपोर्ट बनवणार नाही, असं सांगितलं. मात्र पूजाला लाचेची रक्कम द्यायची नव्हती. 

मनोजने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली. न्यायालयाने मालीया पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अमरत मकवाना याला दोषी ठरवलं. न्यायालयाने आरोपी मकवाना याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमाखाली दोषी ठरवून ५ वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालय