शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:36 IST

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सहदेव सिंह गोहिल असं आहे. सहदेव आरोग्य कर्मचारी आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भारतीय सीमा, बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या कारवाया, परिसराचे फोटो आणि इतर संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवली होती. त्याने गुजरातच्या अनेक सीमावर्ती भागांची माहितीही शेअर केली होती.

चौकशीदरम्यान सहदेव सिंह जून-जुलै २०२३ पासून 'अदिती भारद्वाज' नावाच्या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. दोघांमध्ये व्हॉट्सएपवर संभाषण सुरू होतं. जानेवारी २०२५ मध्ये सहदेव सिंहने त्याच्या आधार कार्डचा वापर करून एक भारतीय सिम कार्ड मिळवलं आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याने ते सिम कार्ड ओटीपीद्वारे आदिती भारद्वाजला दिलं, ज्याद्वारे व्हॉट्सएप कॉलिंग आणि मेसेजिंग सुरू झालं.

हेरगिरीच्या बदल्यात ४०,००० रुपये

हेरगिरीच्या बदल्यात सहदेव सिंहला ४०,००० रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली होती. तो पाकिस्तानसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता. त्याचा फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये पाठवण्यात आला आहे, जिथे त्याचे चॅटिंग, लोकेशन आणि मीडिया ट्रान्सफरचे विश्लेषण केलं जाईल अशी माहिती मिळत आहे. 

हेरगिरी नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग

गुजरात एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या हेरगिरी नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सुरक्षा एजन्सी आता कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल उपकरणांची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतCrime Newsगुन्हेगारी