शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

दुधात गोळ्या टाकून बेशुद्ध केलं अन्... मुलीची मागणी कुटुंबाला पचवता आली नाही, केलं भयंकर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:01 IST

गुजरातमध्ये उच्च शिक्षणाला विरोध करत कुटुंबाने १८ वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या केली.

Gujarat Crime:गुजरातमधून  ऑनर किलिंगची एक हादरवणारी घटना समोर आली आहे. गुजरातमधील बनासकांठा येथील १८ वर्षीय चंद्रिका चौधरीच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. चंद्रिकाचा मृत्यू हा अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला पण तो सुनियोजित खून होता. हृदयविकाराच्या झटक्याने चंद्रिकाचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र तपासानंतर तिच्या वडिलांनी आणि काकांनीच मिळून तिला संपवल्याचे समोर आलं. महत्त्वाचे म्हणजे घाईघाईत तिचे अंत्यसंस्कारही करण्यात आले होते.

बनासकांठा येथील १८ वर्षीय चंद्रिका, जी एमबीबीएसची तयारी करत होती. चंद्रिका चौधरीने नीट परीक्षेत ४७८ गुण मिळवले होते. त्यानंतर ती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी पात्र ठरली. तिला पुढे शिक्षण सुरू ठेवायचे होते पण कुटुंबाने चंद्रिकाची मागणी फेटाळून लावली होती. कुटुंबाची जुनी विचारसरणी आणि संकुचित वृत्ती चंद्रिकाच्या करिअरच्या मध्ये आले. कुटुंबाला भीती होती की जर चंद्रिका बाहेर शिकण्यासाठी गेली तर ती एका मुलाच्या प्रेमात पडेल आणि स्वतःच्या इच्छेने त्याच्याशी लग्न करेल. त्यामुळेच त्यांनी चंद्रिकाला संपवण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. तर हे पूर्वनियोजित 'ऑनर किलिंग'चे प्रकरण होते. तपासात तिच्या वडिलांनी आणि काकांनी तिला मारले. २५ जून रोजी चंद्रिका चौधरीला तिचे वडील सेंधा यांनी बेशुद्धीच्या गोळ्या मिसळलेले दूध पाजले आणि नंतर त्यांनी आणि तिचे काका शिवराम यांनी ओढणीने गळा दाबून हत्या केली. शिवरामने काही गावकऱ्यांना सांगितले की चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला होता.

गुजरात उच्च न्यायालयात चंद्रिकाचा जोडीदार हरेश चौधरीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होण्याच्या दोन दिवस आधीच तिला तिच्या कुटुंबाने मृत घोषित केले होते. चंद्रिकाला हरीशसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते आणि ती डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत होती. पण तिच्या कुटुंबाला हे मान्य नव्हते. शिवराम काही कॉलेजमध्ये गेला होता आणि त्याने मुला-मुलींना एकत्र शिकताना पाहिले होते. त्याने चंद्रिकाच्या वडिलांना सांगितले होते की तिला कॉलेजमध्ये पाठवू नका कारण ती एका मुलाच्या प्रेमात पडेल आणि त्याच्याशी लग्न करेल. 

फेब्रुवारीमध्ये चंद्रिका पहिल्यांदा हरिशला भेटली होती. दूधाचा ग्लास देण्यापूर्वी चंद्रिकाने तिच्या वडिलांकडून दूध पी आणि चांगली विश्रांती घे असे शब्द ऐकले होते. चंद्रिकाच्या हत्येच्या दोन आठवड्यांपूर्वीच या जोडप्याने लिव्ह-इन करारावर स्वाक्षरी केली होती. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. आम्ही कोणालाही इजा करत नव्हतो. आम्हाला फक्त शांततेत राहायचे होते, असं हरीशने सांगितले.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी